कॉंग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 19 जणांचा समावेश, धारिवाल आणि जोशी यांना डच्चू?
Rajasthan Assembly Elections : काही दिवंसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने (Congress) राजस्थानमधील निवडणूकांसाठी दोन उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या होत्या. एकूण ७६ उमदेवारांच्या यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 33 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
निळवंडे प्रकल्प; दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम; 182 गावे ओलिताखाली येणार
शोभराणी कुशवाह कुठून निवडणूक लढवणार?
गुरुवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या यादीत दोन दिवसांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आमदार शोभाराणी कुशवाह यांना धौलपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या सध्या धौलपूरचे आमदार आहेत. बसपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार वाजीब अली यांना नगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
विद्यमान 19 पैकी 11 आमदार
तिसर्या यादीत प्रादेशिक लोकांचा विरोध असतानाही पंचायत राज मंत्री रमेश मीना यांना सपोत्रामधून तिकीट देण्यात आले आहे. या यादीत एकूण 11 विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे समर्थक आमदार राकेश पारीक यांना मसुदा, गजराज खटाना यांना बांदीकुई, हरीश मीना यांना देवळी-उनियारा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
नरेंद्र बुडानिया यांना तारानगर मतदार संघातून उमेदवारी दिली. तर पुसाराम गोदारा यांना रतनगड, राजेंद्र पारीक यांनी सीकर, श्रावण कुमार यांना सूरजगड, गंगादेवी यांना बागरू, लखन मीना यांना करौली, मदन प्रजापत यांना पाचपदरा, मोतीराम कोळी यांना रेवदार, हिरालाल यांना झाडोल, सी.एल. प्रेमी यांना केशवरायपाटन आणि पानचंद मेघवाल यांना बारां-अटरू मधून तिकीट देण्यात आले. काँग्रेसने आतापर्यंत दोनशेपैकी 95 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने अद्याप 105 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विश्वासू मंत्री शांती धारिवाल आणि पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांची नावे उमेदवारांच्या तिसऱ्या यादीतही आलेली नाहीत.
पहिल्या यादीत ९ महिला उमेदवार
काँग्रेसने जाहीर केलेल्या 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत विविध विधानसभा जागांसाठी 9 महिला उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सादुलपूर मतदारसंघातून कृष्णा पुनिया, मांडवामधून रीता चौधरी, मालवीय नगरमधून अर्चना शर्मा, सिकराईमधून ममता भूपेश, जयलमधून मंजू देवी यांचा समावेश आहे.