Rajasthan Election : राजस्थानच्या निवडणुकीत ‘ईडी’ची एन्ट्री! CM गेहलोतांचा मुलगाच अडचणीत

Rajasthan Election : राजस्थानच्या निवडणुकीत ‘ईडी’ची एन्ट्री! CM गेहलोतांचा मुलगाच अडचणीत

Rajasthan Election : राजस्थानात विधानसभा निवडणुका (Rajasthan Election) जाहीर झाल्यापासून राजकारणाचा पारा वाढला आहे. यंदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची एन्ट्री झाली आहे. आज गुरुवारी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर आता मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे पुत्र वैभव गेहलोत यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकारामुळे काँग्रेसचे नेते चिडले असून त्यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

INDIA Alliance : ‘इंडिया’ आघाडीचं जागावाटप कधी? खर्गेंनी थेट सांगूनच टाकलं

केंद्रीय तपास यंत्रणेने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांच्या सात ठिकाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हुडला यांना यंदा काँग्रेसने महुवा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आधी ही कारवाई झाल्याने या वाळवंटी राज्यातील राजकारण तापले आहे.

या कारवाईनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक ट्विट केले. राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या घरी ईडीची रेड. माझा मुलगा वैभवला ईडी समोर हजर होण्यासाठी समन्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल की राजस्थानात दररोज या छाप्यांचे जे प्रकार घडत आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे की येथील महिला, शेतकरी आणि गरीबांना काँग्रेसने जी गॅरंटी दिली आहे त्याचा लाभ मिळावा असे भाजपला वाटत नाही.  25 तारखेलाच काँग्रेसने या गॅरंटी लाँच केल्या होत्या त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून काँग्रेस नेत्यांवर ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली, असे गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपाच्या कारवायांना घाबरणार नाही – पायलट 

आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात बोलणारे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसह डोटासरा यांच्या घरी ईडीच्या छापेमारीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. अशा प्रकारच्या कारवाया करून भाजप काँग्रेस नेत्यांनी घाबरवू शकत नाही. राज्यातील सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते एकसाथ उभे आहेत. या प्रकारच्या कारवायांवरून भाजपाची घबराट स्पष्ट दिसत आहे कारण आगामी निवडणुकीतही राज्यात पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणायचे असे लोकांनी ठरवल्याचे पायलट यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोठा निर्णय! पाठ्यपुस्तकांमध्ये India ऐवजी लिहलं जाणार भारत, बदलाला NCERT ची मंजूरी

राजस्थानात कुणाचं सरकार ?

राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यानुसार राज्यातील 200 जागांपैकी काँग्रेसला 59 ते 69 जागा मिळू शकतात. तर भाजपला 127 ते 137 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरांना 2 ते 6 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 42 टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तसेच 11 टक्के मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 101 जागांची गरज आहे. सध्या राज्यात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube