INDIA Alliance : ‘इंडिया’ आघाडीचं जागावाटप कधी? खर्गेंनी थेट सांगूनच टाकलं

INDIA Alliance : ‘इंडिया’ आघाडीचं जागावाटप कधी? खर्गेंनी थेट सांगूनच टाकलं

INDIA Alliance : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांआधीच इंडिया आघाडीत (INDIA Alliance) खटके उडू लागले आहेत. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या निवडणुकीतील जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील वाद समोर आला होता.  सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.  त्यामुळे निवडणुकाआधी आघाडीत मिठाचा खडा नको म्हणून काँग्रेसने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकारावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी प्रतिक्रिया दिली. खर्गे म्हणाले, की इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर आम्ही पाच राज्यांतील निवडणुकांनंत निर्णय घेणार आहोत. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना खर्गे यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल आणि काँग्रेस सरकार स्थापन करेल. छत्तीसगड आणि राजस्थामधील काँग्रेस सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. येथील लोकांचा सरकावर विश्वास आहे. सरकारच्या कामावर लोक समाधानी आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

केंद्र सरकारकडून कर्नाटककडे दुर्लक्ष 

यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. खर्गे म्हणाले, भाजपने लोकांना जी काही आश्वासने दिली होती त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे असो यातील कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. केंद्र सरकारकडून काँग्रेसशासित कर्नाटककडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्नाटकला कोणताही केंद्रीय प्रकल्प दिला जात नाही अशी नाराजी खर्गे यांनी व्यक्त केली.

राजस्थानच्या जनतेचा मूड काय ?

राजस्थानात यंदा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. सध्यााच्या परिस्थितीत भाजप पुढे दिसत आहे. मागील काही महिन्यात काँग्रेसने चांगली कामगिरी करत वापसी केली आहे. मात्र तरीही भाजप पुढेच दिसत आहे. मध्य प्रदेशात मात्र भाजप-काँग्रेस यांच्यात घमासान होईल अशीच परिस्थिती आहे. पण मार्जिनचा विचार केला तर भाजपला थोडा फायदा देईल. छत्तीसगड राज्यातही दोन्ही पक्षात (Assembly Election) अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे. येथे सत्ताधारी काँग्रेस पार्टी भाजपाच्या पुढे दिसत आहे. तेलंगणा राज्यात यंदाही भारत राष्ट्र समिती सत्ता मिळवेल असा अंदाज किशोर यांनी व्यक्त केला.

Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’

छत्तीसगडमध्ये कोणाला बहुमत मिळणार?

छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताचा जादुई आकडा गाठताना दिसत आहे. राज्यातील 90 जागांपैकी काँग्रेसला 45 ते 51 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलमध्ये भाजपला 39 ते 45 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात. म्हणजेच यंदा छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होईल अशी परिस्थिती दिसत आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा गाठेल असा अंदाज व्यक्त केला जात असला भाजप आणि काँग्रेस यांच्यातील जागांत फार अंतर नाही.  त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही असे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube