देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

मुंबई : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम करु, कोकणात जो त्यांचा झंझावत आहे, तो असाचं सुरु राहिल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. (Former MP Nilesh Rane has withdrawn his decision to retire from active politics.)

काल (24 ऑक्टोबर) दसऱ्यादिवशी निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. अचानक केलेल्या त्यांच्या या घोषणेने भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र 24 तासांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली, दोघांमध्येही जवळपास तीन तास चर्चा झाली. त्यानंतर चव्हाण आणि राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन चर्चा केली. जवळपास एक तास बैठक झाल्यानंतर राणे यांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

सातारा : देवीच्या मिरवणुकीतील जनरेटरचा स्फोट; मूर्तीजवळ बसलेली नऊ मुले होरपळली

यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले, संघटनेत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाव्यात, अशी निलेश राणे यांनी भूमिका आहे. ही भूमिका रास्त आहे. पण भावना जाणून न घेतल्याने ते नाराज होते. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यापुढील काळात कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातील आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांना दिले आहे. त्यामुळे त्यांची नाजारी दूर झाली असून त्यांनी आता त्यांचा निर्णय मागे घेतला आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

कोण आहेत निलेश राणे :

निलेश राणे हे 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्येही ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. पुढे काँग्रेसपासून वेगळे होत त्यांनी वडील नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. या पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी 2019 ची लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यातही त्यांचा पराभव झाला.

जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ

यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिवाय कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख म्हणूनही ते काम करत होते. पुढील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्याने खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube