मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही; अनिल परबांच्या ‘त्या’ आरोपांवर रामदास कदस भडकले

सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत.

Anil Parab

शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसऱ्या मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. बाळासाहेबांच्या बॉडीचो दोन दिवस छळ केल्याचा आरोप कदम (Ramdas Kadam) यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे सेनेकडून प्रत्युत्तर म्हणून अनिल परब यांनी कदमांवर निशाणा साधत जोरदार टीका केली. त्यासोबतच १९९३ मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळलं? याची चौकशी करण्याची मागणी परबांनी केली होती. यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत सर्व काही सांगितलं आहे.

दोन स्टो होते, त्यावेळेला माझी पत्नी जेवण बनवत होती, साडीला आग लागली आणि भडका उडाला, तेव्हा मी माझ्या पत्नीला वाचवलं आहेत. माझे जळलेले हात याचे साक्षीदार असून त्यावेळेला जसलोक दवाखान्यात माझी पत्नी अॅडमिट होती. सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत. जर अशा पद्धतीने बदनामी केली ना मी कोर्टात जाईल आणि दावा टाकेल, असं रामदास कदम म्हणाले.

त्यांच्या पत्नीने जाळून घेतलं की, बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत दावा करणाऱ्या कदमांनाच परबांकडून नार्को टेस्टचं चॅलेंज

योगश कदम यांच्या आईच्या नावाने बार नाहीतर ऑर्केष्ट होता, त्याचं परमिशन होतं. जो चालवत होता त्याचं अॅग्रीमेंट होतं. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की तिथे एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती तेव्हा आम्ही ते हॉटेल बंद केलं आहे. तुमच्यासारखे आम्हाला कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बकऱ्या कापण्याची गरज नाही. माझ्या पत्नीबद्दल जे काही काढलं ना मला दु:ख आणि वेदना झाल्या आहेत. मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही, तुला दाखवीन मी आता, असं म्हणत कदम यांनी परबांना एकप्रकारे थेट इशाराच दिला आहे.

बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं मात्र ते गेल्यानंतर मला एखाद्या तरी मेळाव्यात बोलायला दिलं का? बाळासाहेब असताना मी कुठे बसायचो मात्र नंतर मला कुठे बसवायचे, खुर्चीवर नाव ठेवून हे अख्ख्या जगाने पाहिलं आहे २०१४ ला मला मंत्रिपद दिलं तेव्हा त्यांचा नाऊईलाज होता, हे खातं कोणाला माहित होतं का? मी या खात्याचा अभ्यास करून प्लास्टिकबंदीसारखा निर्णय घेत हे खातं उजेडात आणल्याचं सांगत रामदास कदम यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

follow us