Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, अन्यथा… रामदास कदमांच्या वक्तव्याने महायुतीत ठिणगी

Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, अन्यथा… रामदास कदमांच्या वक्तव्याने महायुतीत ठिणगी

Ramdas Kadam Warns Maharashtra BJP Leaders : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी स्पष्ट शब्दांत भाजपला इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा इशारा दिला.

Ramdas Kadam : ..तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत; रामदास कदमांचं थेट आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या कामावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही महाराष्ट्रात भाजपबरोबर आलो आहोत. आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी विश्वासघात करत केसाने गळा कापू नये अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे. मी सुद्धा गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. यापेक्षा मी जा्त काही बोलणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप होईल त्यानंतर मी माझं मत व्यक्त करील.

रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तालुकानिहाय बैठकाही घेतल्या जात आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपवाल्यांनी जबरदस्तीने हा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की मोदीजींनी व शाहांनी याबाबतीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवायचा आहे. पण, तुमच्यावर विश्वास ठेऊन जी लोकं तुमच्यासोबत आली त्यांचा केसाने गळा कापू नका. या माध्यमातून भाजपला वेगळा मेसेज देत आहोत याचे भान भाजपाच्या लोकांना असले पाहिजे, असेही रामदास कदम म्हणाले.

सर्वांना संपवून भापजलाच जिंवत राहायचं; रामदास कदमांच्या टीकेवर थोरात म्हणाले, हा फक्त ट्रेलर 

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती. तरी सुद्धा माझा मुलगा आमदार योगेश कदम यांच्याविरोधात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले. उघडपणे मतदानही केले. इतकेच नाही तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मी गुहागर विधानसभा मतदारसंघात उभा होतो त्यावेळीही भाजपानेच पाडले हे वास्तव आहे, असे रामदास कदम म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज