Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत; रामदास कदमांचं थेट आव्हान

Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत; रामदास कदमांचं थेट आव्हान

Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray ) एक आव्हान दिलं आहे. कदम म्हणाले की, एकाही आमदारांनी खोके घेतले असतील तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घाशीन आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत. असं म्हणत ठाकरेंना कदमांनी थेट आव्हान दिलं आहे. ते आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.

कन्फर्म! अनुष्का- विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा, ‘या’ देशात देणार बाळाला जन्म

यावेळी बोलताना कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं पिल्लू आदित्य आणि याच बोलणे पाहिलं तर एखादा दिवा विझताना जसा फडफडतो तशी फडफड यांची सुरू आहे. महाराष्ट्रात अपयशी ठरलेला नालायक मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कस काय बोलू शकतो? तसेच एकही आमदारांनी खोके घेतले असतील तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घासायला आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासायचे.असं म्हणत ठाकरेंना कदमांनी थेट आव्हान दिलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्था भाजपकडून खालसा : 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेत

आमदारांना बदनाम करण्यासाठी ठाकरे बाप लेकाने गद्दार हा शब्द वापरला. माझा मंत्रपद काढून आदित्यला दिले बाप मुख्यमंत्री बेटा मंत्री नेता आउट शिवसेना प्रमुखांसोबत जे जे नेते होते. त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काम केलं. ते आपल्या लोकासाठी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सेनेला आतापर्यंत जेवढे जागा मिळाल्याने त्यापेक्षा अधिक जागा यावेळेस मिळतील.

Government Schemes : तारबंदी योजना नेमकी आहे तरी काय? वाचा!

याला त्याला ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरेंनी लागली पाहिजे. म्हणजे खोके कुठे गेले कळतील. आम्ही मातोश्रीला पुष्कळ मिठाई दिली. पण मातोश्री मध्ये एक-दोन खोक्याने चालत नाही. तिथे धबधबा सुरूच राहू द्यावा लागतो. येत्या दहा दिवसात उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे अनेक आमदार शिंदे साहेबांसोबत येणार आहेत. असा गैप्यस्फोटही कदम यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचा मी भविष्य सांगतो. पक्षात फक्त बाप आणि बेटा शिल्लक राहतील. आरक्षण द्यायचं असेल तर ज्याचं पॉट खाली असेल त्याला आरक्षण द्या आर्थिक निकषावर लावा. मराठा आरक्षण देताना ओबीसी वर अन्याय होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ घेऊन गेल्यावर तुम्ही मोदी यांना काय कमेंटमेंट केली होती. ते त्यांना शपथ देऊन विचार म्हणजे सगळं समोर येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज