Ramdas Kadam : ‘समाज अंगावर आला अन् डेंग्यू झाला’; अजितदादांच्या दुखण्यावर कदमांचं बोट

Ramdas Kadam : ‘समाज अंगावर आला अन् डेंग्यू झाला’; अजितदादांच्या दुखण्यावर कदमांचं बोट

Ramdas Kadam : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर दोघांतील वाद आता निवळताना दिसत आहे. मात्र, आता नवा वाद सुरू होईल की काय अशी चिन्हे दिसत आहेत. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता रामदास कदम यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. समाज अंगावर आला तेव्हा अजित पवार यांना डेंग्यू झाला अशी खोचक टीका कदम यांनी केली. यानंतर त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटानेही जोरदार पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरील बैठक संपल्यानंतर रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांची ही टीका अजित पवार गटाच्या जिव्हारी लागली आहे. अजित पवारांवर बोलण्याएवढे रामदास कदम मोठे नाहीत. त्यांनी दादांच्या आजारपणावर बोलणे यातून त्यांची संस्कृती दिसून येते. पवार कुटुंब राज्याची परंपरा जपत आहेत. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीबाबत बोलणं दु्र्दैवी आहे. नाहीतर त्यांच्यावर डोळ्यांना झंडुबाम लावण्याची वेळ येईल अशी टीका अजित पवार गटाने कदम यांच्यावर केली आहे.

वय झाल्याने गजानन किर्तीकर भ्रमिष्ट झालेत’: गद्दारीच्या टिकेनंतर रामदास कदम चवताळले

माझ्या कामावरच किर्तीकर निवडून आले 

1990 मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून तिकीट दिले. केशव भोसले यांच्याबरोबर माझ्याविरोधात दाऊद होता. दाऊदविरोधात निवडणूक लढून मी निवडून आलो. मी खेडमध्ये उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी कांदिवलीत कधी आलो? असा सवाल करत याउलट कांदिवलीत मी केलेल्या कामांवरती किर्तीकर निवडून आले, म्हणजे गजानन किर्तीकर बेईमान आहेत. त्यांना हे शोभत नाही. माझी बदनामी करण्यासाठी खोटी प्रेसनोट काढत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून 2009 साली अनंत गिते यांनी माझा पराभव केला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला अनंत गिते यांचे काम करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे गद्दारीची औलाद आमची नाही, ती गजानन किर्तीकरांची असेल. नारायण राणे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याविरोधात मी एकटा लढत होतो. तेव्हा किर्तीकर घरी बसले होते आणि आता गद्दार कोणाला बोलत आहात? असा सवालही त्यांनी केला.

रामदास कदमांना गद्दारीचा मोठा इतिहास’ : उत्तर-पश्चिम मतदारसंघावरुन शिंदेंचे ‘वाघ’ भिडले

मुलाला निवडून आणण्यासाठी पक्षाशी बेईमानी करण्याचे काम गजानन किर्तीकर करत आहेत. त्यांचे पितळ उघड पडल्याने पित्त खवळले आहे. घरची भांडण घरातच मिटली पाहिजे होती. मात्र, अशाप्रकारे शिमगा करून पक्षाची इज्जत घालवण्याचे काम सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube