Udhhav Thackeray काय रे बाबा, जागेवर आहेस ना? ठाकरेंकडून तनपुरेंना मिश्किल टोला

Udhhav Thackeray काय रे बाबा, जागेवर आहेस ना? ठाकरेंकडून तनपुरेंना मिश्किल टोला

Udhhav Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. यातच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) नगर जिल्हा दौऱ्यावर आहे. शिर्डी लोकसभा ते पिंजून काढत असताना राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure) यांची विचारपूस त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना मिश्किल टोलाही लगावला. काय रे बाबा, जागेवर आहेस ना? असा असं म्हटल्यावर मंचावर एकच हस्यकल्लोळ उडाला. दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्याने चव्हाण यांच्यावर देखील ठाकरे यांनी निशाणा साधला.

Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? अखेर सत्य आलं समोर

येत्या काळात निवडणुका आहे त्या अनुषंगाने आता ठाकरे गटाने देखील पायाला भिंगरी बांधत मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यातच शिर्डी लोकसभा मतदार संघात सध्या ठाकरेंकडून आढावा घेतला जातो आहे. शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्याचे बोलले जात आहे. वाकचौरे हे ठाकरे सोबत संवाद मेळाव्यात फिरत असून लोकसभेच्या अनुषंगाने एकप्रकारे ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन देखील सुरू आहे.

Valentine Day : सर्वाधिक भारतीय कोणत्या भाषेत देतात प्रेमाची कबुली? उत्तर ऐकूण व्हाल शॉक!

नुकतेच राहुरी तालुक्यात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राहुरीमध्ये आल्यानंतर ठाकरे यांचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या मतदारसंघात स्वागत केलं. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना शाब्दिक टोलाही लगावला. काय रे बाबा, जागेवर आहेस ना? असं मी प्राजक्तला गाडीतून उतरल्यावर विचारलं. प्राजक्त पण आणि तुमचे मामा पण, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे मामा आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube