Udhhav Thackeray : राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, ठाकरेंचे फडणवीसांवर ताशेरे

Udhhav Thackeray : राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, ठाकरेंचे फडणवीसांवर ताशेरे

मुंबई : “फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे,” असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray ) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

निखील वागळेंसह 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल, हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा

ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक म्हटलं, फडतूस म्हटलं. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शब्द देखील कमी पडत आहेत. हे अत्यंत सौम्य शब्द आहेत. असं वाटत आहे की, त्यांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संताप जनक प्रतिक्रिया होती.

भाजपचे कार्यकर्ते वागळेंसह पुरोगाम्यांवर तुटून पडलेले त्यावेळी भक्ती कुंभार थेट भिडल्या…

राज्यात अशा प्रकारे कायद्याची धिंडवडे निघत असताना संबंधित मंत्री जबाबदार असतो. तसेच संबंधित मंत्र्याकडून कारभार व्यवस्थित होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालायला हवं. मात्र ते स्वतःच गुंडांना पोसत आहेत. मात्र त्यांच्या कोणामध्येच एकमेकांकडे बोट दाखवण्याची हिंमत नाही. कारण ते स्वतःच झाकून ठेवत दुसऱ्यांचा वाकून बघत आहेत.

Siddharth Anand: ‘फायटर’च्या किसिंग सीनबद्दल दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले…

फडणवीस म्हणाले उद्या कुणाच्या गाडीखाली कुत्रे आले तरी देखील गृहमंत्र्यांना जबाबदार धरतील. मात्र अशा प्रकारे शब्द वापरले म्हणजे तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तर तुम्ही निर्ढावलेले आणि निर्घृन मनाचे गृहमंत्री आहात. राज्यात हत्या होत असताना गृहमंत्री त्याची तुलना एका कुत्र्याबरोबर करत आहेत. तुम्ही दिल्लीत शेपूट हलवत असाल. तसेच भाजपमध्ये या आणि सगळं विसरून जा, असे म्हणत ही गुंडांना दिलेली भाजपची मोदी गॅरंटी आहे. अशी टीका ठाकरेंनी गृहमंत्री फडणवीसांवर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज