Udhav Thackeray : ‘पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला..,’; उद्धव ठाकरेंची सरकारवर टोलेबाजी

Udhav Thackeray : ‘पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला..,’; उद्धव ठाकरेंची सरकारवर टोलेबाजी

Udhav Thackeray : सत्ताधाऱ्यांकडे पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला नसल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर टोलेबाजी केलीयं. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर असून शिर्डीमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द

उद्धव ठाकरे म्हणाले, पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नूकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नूकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. नूकसानीचे पंचनामे कधी होतील? ही भरपाई कधी मिळेलय़ एक रुपयांत पीकविम्याचं धोटांड सरकारने मांडलं असून अस्मानी नाहीतर सरकारची सुलतानी शेतकऱ्यांवर पडत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Mission Raniganj Teaser: ‘मिशन राणीगंज’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ एका सीनवर चाहते म्हणाले…

तसेच शेतकऱ्यांवर संकटात असून ना पालकमंत्री ना कृषीमंत्री फिरत आहेत, सरकारने भटकण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे, सत्ताधाऱ्यांकडे पक्ष फोडायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना द्यायला नसल्याचाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

India की भारत; काय आहे कलम- 1?

राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नूकसान झालं आहे, त्यांचे पंचनामे, नूकसान भरपाई कधी मिळणार आहे, सरकार आपल्या दारी अन् दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून हे सरकार नूसतचं थापा मारतंय, हे तिडमागडं सरकार असून तीन तिघाडा काम बिघाडा असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून स्वत:चे काम जोरात केले जात असून शिर्डीतही शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जवळपासही भटकू दिलं नसल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube