Devendra Fadanvis : राजकीय कुटुंबातील लोकांनीही राजकारणात यावं पण… फडणवीसांनी दिला सल्ला

Devendra Fadanvis : राजकीय कुटुंबातील लोकांनीही राजकारणात यावं पण… फडणवीसांनी दिला सल्ला

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एक सल्ला दिला. की, असे नाही की, कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये. राजकीय माणसाच्या परिवारातले (political Family) लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही. ते एखाद्याचा मुलगा मुलगी आहे नातू आहे सून आहे किंवा एवढ्याच क्वालिफिकेशन वर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये, त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे. असा सल्ला नव्याने राजकारणात येणाऱ्यांना दिला. ते ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या रामायण महोत्सवात बोलत होते.

Sunny Deol: तारा सिंहच्या ‘गदर 3’ संदर्भात मोठी माहिती समोर, शूटिंगला होणार लवकरच सुरूवात

यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचा दाखला देत त्यांचं कौतुक केलं ते म्हणाले की, मोदींच्या योजनांमुळे गरिबी रेषेच्यावर येणे हा रेकॉर्ड आहे. ज्याच्या मनात राम, कामात राम त्यांच्या कडून असे घडू शकते. अनेक योजना नरेंद्र मोदींनी आणल्या आहेत. राम कार्यात भ्रष्टाचार चालणार नाही. राजीव गांधी दिल्लीमधून 1 रुपया पाठत होते मात्र मागील माणसाकडे 25 पैसे जायचे. त्यामुळे मोदींकडून 1 रुपय पाठवले तर ते पूर्ण पैसे मिळतात.

विनायक मेटेंचे घर अन् संघटना फुटली : भाऊ, बहिण अन् भाच्याची वेगळी चूल; ज्योती मेटे एकाकी!

असे नाही की कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये. राजकीय माणसाच्या परिवारातले लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही आहे. ते एखाद्याचा मुलगा मुलगी आहे नातू आहे सून आहे किंवा एवढ्याच क्वालिफिकेशन वर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये,त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे. असे वाटते की प्रभू श्रीरामांनी सांगितले राज्य सर्वसामान्यांचे असले पाहिजे हे राज्य हे केवळ मूठभर लोकांचे असू नये. आज आपण पाहतोय मोदीजींनी देखील सामान्य माणसाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अधिकार दिला.

खरंच सोपं नाही! ब्रह्म मुहूर्तावर उठणं, नारळ पाण्याचं सेवन अन् जमिनीवर झोप; प्राणप्रतिष्ठेसाठी मोदी काय-काय करतात?

आज प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. याचं कारण त्या त्या युगाची तत्त्व ठरवणारी मूल्य ठरवणारी जी माणसं असतात. ती युगपुरुष असतात. प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसाचा जन्म त्याठिकाणी घेतलाय आणि त्यांनी विचार केला असता तर कदाचित एवढ्या मोठ्या सैन्याची आवश्यकता देखील पडली नसती . प्रभू श्रीरामांना हे माहिती होतं की एका रावणाला मी मारलं तर दहा रावण तयार होतील. प्रभू श्रीरामांनी सर्वसामान्यांची सेना तयार केली त्यांच्या सेनेमध्ये अतिशय सामान्य अशा प्रकारचे नरवानर प्राणी जेवढे सगळे होते. असे सगळे लोक होते की ज्यांना कुठला चेहरा नव्हता ज्यांना कुठली ओळख नव्हती. अशा प्रकारचे लोक दुसरीकडे रावणाकडे जर आपण बघितलं तर रावणाकडे मोठ्या मोठ्या योद्धांची फौज होती. पण हे सामान्य लोकं जे रामाचे सैनिक होते या सामान्य लोकांनी त्या ठिकाणी लंकेवर आक्रमण करून रावणाला पराजित केले.

सामान्य माणसाने मनात आणले मोठे परिवर्तन करू शकतो. ज्या लोकांनी लोकशाहीमध्ये कधी सहभाग देखील घेतला नव्हता अशा लोकांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचं काम हे मोदीजींनी केले आहे. कुवर नंतर जगामध्ये सर्वात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे. आता पाचव्या क्रमांकावर आपण आलो आहोत कारण आपली ताकद आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मोदींनी आपल्याला आठवण करून दिली. आज परिणाम जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रांजेक्शन मध्ये भारताचा चीनला देखील मागे टाकले आहे. भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवले. जे अमेरिकेलाही जमलं नाही, जे जपानलाही जमलं नाही हे भारताने करून दाखवले. रामायण महोत्सव तीन दिवस चालणार आहे रामाचे प्रभू श्रीरामांचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रामराज्य स्थापित करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज