Family Political Crisis : काका विरुद्ध पुतण्या! कोण ठरलं देशातील राजकीय आखाड्यात ‘वस्ताद’
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र असो वा देश असो काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष नवीन नाही. महाराष्ट्राने या अगोदरदेखील काका व पुतण्याचा संघर्ष पाहिला आहे. सध्या शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळतो आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष उफाळून आला आहे. देशात व राज्यात आत्तापर्यंत कोणकोणत्या काका व पुतण्याचा संघर्ष झाला आहे ते आपण पाहणार आहोत.
शरद पवार विरुद्ध अजित पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात जाणते राजे म्हणवल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला वारसा कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवला. यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी केली. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते मंडळी आहे. त्यामुळे अजित पवार व शरद पवार या काका पुतण्यामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. पक्षाचे सर्वधिक आमदार कुणाच्या पाठीमागे उभे राहणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आव्हाडही भाजपसोबत जाण्यासाठी अजितदादांना ‘हो’ म्हणाले होते, पण… :
आखिलेश यादव विरुद्ध शिवपाल यादव
उत्तर प्रदेशचा राजकारणामध्ये अखिलेश यादव विरुद्ध त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यामध्ये देखील संघर्ष झाला होता. शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्ष सोडून आपल्या समर्थकांसह नवीन पक्ष स्थापन केला होता. आखिलेश यादव हे स्वतःला मुलायम सिंह यादव यांचे वारसदार ठरविण्यात यशस्वी झाले होते तर शिवपाल यादव यांना मुलायम सिंह यादव यांचा वारस म्हणून मान्यता मिळवण्यात यश आले नाही. शिवपाल यादव यांनी 2019 साली फिरोजाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु यात त्यांना यश आले नाही. तसेच त्यांच्या पक्षाकडून जे उमेदवार निवडणूक लढले होते, त्यांना स्वतःचे डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. पुढे त्यांनी आपला पक्ष समाजवादी पक्षात विलीन करुन टाकला.
अभय चौटाला विरुद्ध दुष्यंत चौटाला
असाच संघर्ष हरियाणामध्ये अभय चौटाला विरुद्ध दुष्यंत चौटाला यांच्यामध्ये झाला होता. अजय चौटाला यांनी आपले दोन्ही मुलं दुष्यंत चौटाला व दिग्विजय चौटाला यांना राजकारणामध्ये आणले. यानंतर राजकारण असे तापले की, अभय चौटाला यांनी दुष्यंत चौटला व दिग्विजय चौटाला यांना पक्षातून हाकलून दिले. यानंतर अजय चौटाला यांनी आपल्या दोन्ही मुलांसह नवीन पक्ष स्थापन केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजय चौटाला यांनी 10 जागा जिंकत भाजपसोबत सरकार स्थापन केले.
अजितदादांचं बंड होणार हे माहित होत पण… रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट
पशुपति विरुद्ध चिराग पासवान
बिहारच्याच राजकारणामध्ये रामविलास पासवना यांचा मृत्यू झाल्यानंतर चिराग पासवान व त्यांचे काका पशुपति पारस यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष झाला. पशुपति पारस यांनी चिराग पासवान यांना सोडून बाकीच्या सर्व खासदारांना आपल्या सोबत घेतले व एलजेपी पक्षावर दावा ठोकला. यानंतर पशुपति पारस हे मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. त्यामुळे बिहारमध्ये देखील काका-पुतण्यात जोरदार संघर्ष पहायला मिळाला.
बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे
महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा संघर्ष बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये पहायला मिळाला. बाळासाहेबांनी शिवसेनेची कमान आपले पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्यानंतर लगेचच वर्षभरात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जाहीर भाषणांमधून बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांनी एकमेकांवर जाहीर टीका केली होती. ॉ
गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यामध्ये असाच संघर्ष पहायला मिळाला होता. धनंजय मुंडे यांनी भाजपसोडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्याअगोदर पंकजा मुंडे यांची राजकारणात एंट्री झाली होती. 2009 साली विधानसभेचे तिकीट धनंजय मुंडे यांना जाहीर झाले होते, पण त्यानंतर ते पंकजा मुंडे यांना देण्यात आले. यानंतर धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला.