अजितदादांचं बंड होणार हे माहित होत पण… रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट

अजितदादांचं बंड होणार हे माहित होत पण… रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट

Rohit Pawar on NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले. त्यावर शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे की, भाजप राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज होता. मात्र आमच्या पक्षातील नेते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत अशी खात्री होती. ( We Known about Ajit Pawar rebellion says Rohit Pawar on NCP Political Crisis )

Sunil Shelke : सत्तेत जायचं हे सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच ठरलं, आमदार शेळकेंचा खळबळजनक गौप्यस्पोट

बंड होणार हे माहित होत पण…

अजित पवारांनी केलेले बंड जे झालं ते अत्यंत वाईट झालं आहे. मात्र अजूनही आम्हाला आपेक्षा आहे की, जे झालंय ते पुन्हा पूर्वी सारख होईल. पवार साहेबांनी गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास कमावला आहे. पुढे त्यांना असं विचारण्यात आला त्यावर रोहित म्हणाले की, आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला देखील भाजप राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज होता. मात्र आमच्या पक्षातील नेते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत अशी खात्री होती. पण दुर्दैवाने काही नेत्यांनी भाजपला प्रतिसाद दिला आहे. त्याचं दुःख नक्कीच आहे. अजितदादांनी मला नेहमीच मदत केली. हा भावनिक मुद्दा मात्र पक्षाचा विषय विचारांशी जोडलेला असतो. पवार साहेब त्याच्याशी तडजोड करणार नाही. तर ज्या नेत्यांना पवारांनी ताकद दिली त्यांनी असं केल्याने पवारांना दुःख झाले असेल. अशी प्रतिक्रिया यावेळी रोहित पवारांनी दिली.

‘कधी कधी वाटतं मोबाईल बंद करावा अन् दिंडीत निघून जावं’; राष्ट्रवादीतील नाट्यावर लंके बोलले

पुढे रोहित पवार असं देखील म्हणाले की, अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांबद्दल ईडीच्या कारवाईने भाजपसोबत गेल्याची चर्चा आहे. लोकांची ही चर्चा भुजबळांसारख्या लोकनेत्याबद्दल देखील ही त्यांच्यासाठी घातक आहे. थोडेच दिवस राहिले होते आपल्या पक्षाची संघटनात्मक तयारी करून निवडणुकीला सामोरे गेल्यावर आपण निवडणुक जिंकलो असतो. त्यानंतर अजित पवार हे आज विरोधी पक्षनेते म्हणून चांगल काम करत होते. तसेच असं देखील म्हटलं जात की आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री असतो. मी देखील नेहमी म्हणतो की त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याचे क्षमता आहे. मग असं एका वर्षासाठी तात्पुरतं सत्तेत जाण्यात काय अर्थ? त्यामागे वेगळं कारण असू शकतं. जे कारण आज ते सांगत आहेत ते आज तरी राजकाणात बसत नाही. आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबत एका वर्षासाठी का जायचं? असा सवाल यावेळी रोहित पवारांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube