Sunny Deol: तारा सिंहच्या ‘गदर 3’ संदर्भात मोठी माहिती समोर, शूटिंगला होणार लवकरच सुरूवात

Sunny Deol: तारा सिंहच्या ‘गदर 3’ संदर्भात मोठी माहिती समोर, शूटिंगला होणार लवकरच सुरूवात

Sunny Deol Gadar 3 Confirmed: बॉलिवूडचा (Bollywood) सुपर डुपर हिट चित्रपट ‘गदर-एक प्रेम कथा’ ने (Gadar ) बॉक्स ऑफिसवर (box office) इतिहास रचला होता. तारा सिंगची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलचा (Sunny Deol ) हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. गदर-2 हा चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षांनंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. गदरप्रमाणे या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर (box office) धमाका केला. दरम्यान, सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. गदर फ्रँचायझीच्या निर्मात्यांनीही गदर-3 (Gadar 3) बनवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तारा सिंगची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

अनिल शर्मा यांनी गदर 3 बनवण्याची पुष्टी केली: पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, गदर आणि गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी गदर 3 बनवण्याची पुष्टी केली आहे. त्याची कथाही बंदिस्त झाली आहे. झी स्टुडिओने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. पिंक व्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, झी स्टुडिओ, अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्यातील पेपरवर्कही पूर्ण झाले आहे. गदर-2 रिलीज झाल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांची टीमही गदर-3 बनवण्याच्या विचारात होती.

दोन्ही चित्रपटांपेक्षा गदर 3 अधिक धमाकेदार असणार: ‘गदर 3’ हा चित्रपटही भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आणि धमाकेदार असेल असे निर्मात्यांनी सांगितले आहे. यामध्येही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू गोंयची शक्यता आहे. अनिल शर्मा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जर्नी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांची मुले उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सानियाला घटस्फोट न देताच शोएब मलिकनं थाटला दुसरा संसार; अभिनेत्री सनासोबत बांधली लग्नगाठ

बॉर्डरचाही सिक्वेल असणार: सनी देओलच्या बॉर्डर या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल देखील बनवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा धमाका केला की आजपर्यंत चाहते ते विसरलेले नाहीत. बॉर्डर व्यतिरिक्त सनी देओल सध्या लाहोर: 1947 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज