Prajakt Tanpure : निवडणूक निकालाच्या धसक्याने रोहित पवार टार्गेटवर; तनपुरेंची टीका

Prajakt Tanpure : निवडणूक निकालाच्या धसक्याने रोहित पवार टार्गेटवर; तनपुरेंची टीका

Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीवरुन राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure ) यांनी टीका केली आहे.

Video : शरद मोहोळचा ‘गेम’ कसा झाला; CCTV फुटेज आलं समोर

ते म्हणाले की, राज्यात पुन्हा एकदा छापेमारी सत्र सुरू झाले आहे. युवकांच्या संघर्षाला बुलंद करणारे आमदार रोहित पवार यांना आता टार्गेट केले गेले आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या निकालाचा धसका सत्ताधाऱ्यांनी आधीच घेतलेला दिसतो. त्यामुळे विरोधकांना सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा शब्दांत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

Mumbai Culture Festival: 13 व 14 जानेवारीला मुंबई संस्कृती महोत्सव

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत काही निवडक लोक राहिले आहेत. त्यामुध्ये कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे शरद पवारांचे खंदे समर्थक आहेत. मात्र यांच्यावर अजित पवार गटाकडून वारंवार हल्ले चढवले जातात. त्यामध्ये आता या ईडीच्या छाप्यांमुळे रोहित पवार पुरते अडचणीत आले आहेत.

उद्धव ठाकरे नाशिकमध्ये साजरा करणार श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा; भव्य सभाही घेणार!

या अगोदर देखील रोहित पवारांच्या याच बारामती अॅग्रोमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी प्रदुषणाच्या कारणावरून त्यांना महाराष्ट्र प्रदुषण विभागाने 72 तासांत प्लॅंट बंद करण्याची नोटीस दिली होती. मात्र त्यावर त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली होती. मात्र आता पुन्हा ते याच कंपनीमुळे मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये अडकले आले आहेत.

ती कारवाई म्हणजे निवडणुकीचा धसका…

राज्यात पुन्हा एकदा छापेमारी सत्र सुरू झाले आहे. युवकांच्या संघर्षाला बुलंद करणारे आमदार रोहित पवार यांना आता टार्गेट केले गेले आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या निकालाचा धसका सत्ताधाऱ्यांनी आधीच घेतलेला दिसतो. त्यामुळे विरोधकांना सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असो. निष्ठेने समाजकार्यात वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राज्यातील सर्वमान्य जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा राहील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज