Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? अखेर सत्य आलं समोर

Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? अखेर सत्य आलं समोर

Aditya Narayan Controversy: बॉलिवूड (Bollywood) गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या खूप ट्रोल होत आहेत. आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यामध्ये तो छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये एका कॉन्सर्टमध्ये चाहत्याला त्याने माइकने मारताना आणि त्याचा फोन गर्दीत फेकताना पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (social media) आदित्यवर बोचरी टीका होत आहे. आता कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजरने या संपूर्ण प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bachelor Boys (@bachelor_life_bhilai)


कार्यक्रमादरम्यान आदित्य नारायणने चाहत्यांना का मारले? प्रकरण 12 फेब्रुवारी 2024 दिवशी घडली आहे. भिलाई येथील एका कॉलेज इव्हेंटमधील आदित्य नारायणचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये आदित्य आनंदाने गाताना आणि प्रेक्षकांमध्ये मिसळताना दिसत आहे. मात्र, त्याच्या परफॉर्मन्सच्या मध्येच, गायक चाहत्याच्या हातावर मारतो आणि त्याचा फोन हिसकावून गर्दीत फेकतो. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. झूम टीव्हीशी संवाद साधताना, त्याच कॉन्सर्टच्या इव्हेंट मॅनेजरने आदित्यचा नेमकं असं का वागला हे स्पष्ट केले आहे. इव्हेंट मॅनेजरने सांगितले की, आदित्यने ज्या व्यक्तीचा फोन टाकला तो विद्यार्थी नसून बाहेरचा माणूस होता. त्या व्यक्तीने परफॉर्मन्सदरम्यान आदित्यसोबत जवळपास 200 सेल्फी घेतले असावेत. तो सतत आदित्यचे पाय खेचत होता आणि अनेकवेळा तो फोनने पायावर मारण्याचा प्रयत्नही केला होता. सुरुवातीला चुकून असे घडले असावे, असे समजून आदित्यने ते टाळले होते. मात्र, तो माणूस न थांबल्याने आदित्यने संयम सोडला आणि त्या व्यक्तीचा फोन फेकून दिला.

Singham 3: अर्जुन कपूर बनणार भयानक खलनायक, रोहित शेट्टीने शेअर केला ‘सिंघम 3’चा पहिला लूक

इव्हेंट मॅनेजर पुढे म्हणाला की, त्या घटनेनंतरही गाण्याची मैफिल ही 2′ तास सुरू राहिली. यानंतर इव्हेंट मॅनेजरने देखील प्रश्न केला की संबंधित व्यक्ती आदित्यच्या वागणुकीबद्दल तक्रार करण्यास का पुढे आली नाही. तर यावर तो म्हणाला की त्या माणसाला माहित आहे की ही आपली चूक आहे आणि म्हणूनच तो गायकाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आला नाही.

आदित्य नारायण किंवा त्यांच्या टीमने या घटनेवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही: सध्या आदित्य आणि त्याच्या टीमने त्या घटनेबाबत कोणतेही अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, आता अखेर इव्हेंट मॅनेजरने सत्य उघड केले आहे. आदित्य नारायण हे ज्येष्ठ बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज