काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्था भाजपकडून खालसा : 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेत

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्था भाजपकडून खालसा : 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेत

पुणे : माजी सहकार मंत्री आणि भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पाटील यांच्या निवडीनंतर तब्बस 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या संस्थेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. (For the first time in the 64-year history of the National Cooperative Sugar Factory Federation, BJP is in power)

देशातील साखर क्षेत्राचा विकास करण्यासाठी, मजबूत सहकारी साखर क्षेत्र तयार करण्यासाठी 1960 साली राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची स्थापना झाली. देशभरातील सर्व सहकारी साखर कारखाने आणि राज्य सहकारी साखर महासंघ हे या संस्थेचे पदसिद्ध सदस्य आहेत. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर साखर धोरण तयार करण्यात आणि भारतातील क्षेत्राच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अजेंडा निश्चित करण्यास ही संस्था मदत करते.

मोठी बातमी! धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार

स्थापना झाल्यापासूनच या संस्थेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व होते. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, तमिळनाडू या राज्यांमधील बडे नेते या महासंघाच्या संचालक मंडळावर निवडून येत आहेत. यापूर्वी दिलीप वळसे पाटील, कलाप्पा आवाडे, विजयसिंह मोहिते पाटील, प्रकाश आवाडे, हर्षवर्धन पाटील अशा अनेक नेत्यांनी संचालक म्हणून काम केले आहे.

काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील, जयप्रकाश साळुंके – दांडेगावकर अशा महाराष्ट्रातील नेत्यांनी यापूर्वी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र 2014 पासून भाजपने महाराष्ट्रासह देशभरातील सहकारी संस्थांवर लक्ष देण्यास सुरुवात केली. सहकार क्षेत्रातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन ताकद देण्याचे धोरण आखले. त्यातून देशातील अनेक सहकारी कारखान्यांंवर भाजप नेत्यांची निवड होऊ लागली. यातूनच केंद्रीय सहकार मंत्रालयाचीही स्थापना करण्यात आली.

विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी

त्यानंतर आता नुकतीच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची 2024 ते 2029 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात बहुतांश भाजपचे नेते संचालक म्हणून निवडून आले आहेत. यातच आता हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सहकार मंत्री म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवातून पाटील यांची निवड झाल्याची चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज