कन्फर्म! अनुष्का- विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा, ‘या’ देशात देणार बाळाला जन्म

कन्फर्म! अनुष्का- विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा, ‘या’ देशात देणार बाळाला जन्म

Anushka Sharma Pregnancy: अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) आणि विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच जोरदार चर्चेत असतात. सध्या या कपलच्या दुसऱ्या बाळाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. (Anushka  Sharma Pregnancy) अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या सगळ्यात आता सोशल मीडियावरून एक संकेत मिळत आहे की, हे जोडपे त्यांच्या दुस-या बाळाचे देशात नव्हे तर परदेशात स्वागत करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)


अनुष्का शर्मा तिच्या दुसऱ्या मुलाला लंडनमध्ये जन्म देणार का? उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. त्याने नुकतेच त्याच्या X अकाऊंटवर एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘अवघ्या काही दिवसात बाळाचा जन्म होणार आहे. आता तो वडिलांसारखा क्रिकेटर बनतो की आईप्रमाणे चित्रपटांमध्ये करिअर करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यासोबतच मुलाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हर्ष गोएंका यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 2020 मध्ये विराट कोहलीने अनुष्काच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर दिली होती. जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव वामिका कोहली आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप मीडियासमोर मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. दोघांनाही त्यांचे वैयक्तिक आयुष्य अगदी खाजगी ठेवले आहे.

Sunny Leone: सनी लिओनी ‘ग्लॅम फेम सीझन 1’ची होणार जज

या चित्रपटात अनुष्का शर्मा दिसणार: अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज