सर्वांना संपवून भापजलाच जिंवत राहायचं; रामदास कदमांच्या टीकेवर थोरात म्हणाले, ‘हा फक्त ट्रेलर…’

सर्वांना संपवून भापजलाच जिंवत राहायचं; रामदास कदमांच्या टीकेवर थोरात म्हणाले, ‘हा फक्त ट्रेलर…’

Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुक (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसातसी जागावाटपावरून रस्सीखेच वाढत चालली. आता रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. असं विधान करत त्यांनी भाजपवरही टीका केली. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचं का, असा सवाल त्यांनी केला.यावरून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) प्रतिक्रिया दिली.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : मोदी-शहा लोकसभेच्या रिंगणात 

येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असतांना महायुतीत अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. हाच धागा पकडून बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्षांतील संघर्ष आता दिसू लागला आहे. हा संघर्ष आता कुठंतरी सुरू झाला आहे. हा फक्त ट्रेलर आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा खरा सिमेना पाहायला मिळणार आहे, असं थोरात म्हणाले.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : नितीन गडकरींना पहिल्या यादीतून डच्चू 

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केलं. ते म्हणाले की, रामदास कदम जे बोलले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य हे काही महायुतीचं मत नाही. त्यांचं ते वैयक्तिक मत आहे.

पुढं बोलतांना बावनकुळे म्हणाले की, मी अनेकदा म्हणतो की भाजप आपल्या मित्रपक्षांना चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आम्ही घटक पक्षांचा खूप आदर करतो. काँग्रेस पक्षाने आपल्या घटक पक्षांना संपवलं. मात्र, आम्ही घटक पक्षांना प्रचंड ताकद आणि मान-सन्मान दिला आहे, असं बावनुकळे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएत येऊ शकतात का? याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि फडणवीस यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. त्यामुळे आमची मनं दुखावली आहेत. 2014 ते 2019 या काळात फडणवीस उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार अनेक निर्णय घेत होते. मी स्वत: याचा साक्षीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता रत्नागिरीच्या जागेवर भाजप आणि शिंदे गटही आपला दावा सांगत आहे. त्यामुळं या जागेवर कोणाला उमेदवारी मिळते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube