त्यांच्या पत्नीने जाळून घेतलं की…, बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत दावा करणाऱ्या कदमांनाच परबांकडून नार्को टेस्टचं चॅलेंज

Anil Parab बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत दावा करणाऱ्या कदमांना परबांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबाबत गौप्यस्फोट करत उत्तर दिलं.

Anil Parab Answered To Ramdas Kadam

Anil Parab Answered to Ramdas Kadam Allegations about Balasaheb Thackeray death : शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात गंभीर आरोप केले की, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला, त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेतले. असे आरोप त्यांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदमांच्या पत्नीच्या मृत्यूचा मुद्दा समोर आणत कदमांनाच नार्को टेस्टचं आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले अनिल परब?

रामदास कदम हा भाडगिरी, दलाली करणारा नेता आहे. अशा भाडगिरी करणाऱ्यांना आम्हाला उत्तर द्यायचे नाही. पण त्यांना 14 -15 वर्षानंतर कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिथे होतो. तसेच उद्धव ठाकरे वाईट होते. तर 2014 साली मंत्रीपद का घेतलं? त्यामुळे रामदास कदम खोटे बोलताय. बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिथे होतो. सगळी जबाबदारी माझ्यावर होती. असं काहीही झालेलं नाही.तसेच मृत व्यक्तीच्या हाताचे ठसे घेऊन उपयोग काय? पण हे लोक बाळासाहेबांच्या मृत्यूचे देखील आता राजकारण करत आहेत.

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक वळण; शिंदेंचे OSD मंगेश चिवटेंच्या भावावर प्राणघातक हल्ला

त्यामुळे ज्या प्रमाणे रामदास कदम म्हणाले आहेत. त्याप्रमाणे त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. म्हणजे सत्य समोर येईल. तसेच आणखी एक नार्को टेस्ट करायला हवी. ती म्हणजे 1993 साली कदमांच्या पत्नीचा जळून मृ्त्यू झाला होता. मात्र त्यांनी यामध्ये स्वत:ला जाळून घेतलं की, त्यांना जाळलं गेलं. याबाबत सत्य समोर आलं पाहिजे. त्यांच्या घरातले लोक आत्महत्या का करताय? ज्योती कदम यांच्या आत्महत्या प्रयत्नाच्या वेळचे साक्षीदार खेडमध्ये आहेत त्यांना मी समोर आणू शकतो.असा गौप्यस्फोट करत परब यांनी कदमांनाच नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचं आगळं-वेगळं आंदोलन, टीझर सादर करत “बेमुदत ठिय्या “आंदोलनाचा इशारा

तसेच बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत खोटे दावे करणाऱ्या कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकाणार आहे. त्यात कदमांची मार्केट व्हॅल्यू शून्य आहे. पण न्यायालय जी मार्केट व्हॅल्यू ठरवेल ती शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाईल.त्यामुळे कदमांनी जाहीर माफी मागावि अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे. तसेच त्यांनी दारू पिऊन खेडमध्ये काय धुमाकूळ घालताय? हे अधिवेशनात आणणार आहे. मात्र डान्सबार चालक वाळूमाफिया अशा शिशुपालांना मुख्यमंत्री का वाचवत आहेत? असा सवाल परब यांनी केला आहे.

follow us