मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, पुढील 4 दिवस कुठं काय असणार स्थिती?

ही सगळी परिस्थिती आटोक्यात येते ना येते तोपर्यंत चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

Rainnnn..

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. (Rain) विशेषतः मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपले. गावागावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. शेत पाण्याखाली गेली. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

ही सगळी परिस्थिती आटोक्यात येते ना येते तोपर्यंत चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाली आहे. दुसरीकडं अरबी समुद्रात शक्ती नावाची चक्रीवादळ सक्रिय झालं असून कोकण किनारपट्टी तसंच मुंबई ठाणे या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आहेत.

सरकारने त्या; निर्णयाचा पुनर्विचार करणं गरजेचं; शरद पवारांची राज्य सरकारच्या निर्णयावर टीका

पुढील चार दिवस हवामान खात्याने मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली आहे. 5 ऑक्टोबर रोजी पालघर ठाणे, नाशिक धुळे नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे. तर, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 ऑक्टोबर रोजी नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. तर परभणी, हिंगोली, धाराशिव ,लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना, नंदुरबार जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, नाशिक, धुळे नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना ,जळगाव या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे. 8 ऑक्टोबर रोजी परभणी हिंगोली तसेच रत्नागिरी सातारा सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. 9 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्याला येलो अलर्ट आहे.

follow us