Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’

Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’

Assembly Election : देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याआधी काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायचीच या इराद्याने तयारी केली जात आहे. यातच आता जनसुराजचे प्रमुख आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काही अंदाज वर्तवले आहेत.

‘सनातन’वरून योगी भडकले! ‘रावण, बाबर, औरंगजेब संपवू शकले नाहीतर हे तुच्छ..,’

निवडणुकीत (Assembly Election)  कुणाची बाजू वरचढ असेल याचा अंदाज किशोर यांनी सांगितला आहे. किशोर यांची भाकिते बऱ्याचदा खरी ठरतात. त्यामुळे त्यांनी केलेला अंदाज कुणासाठी फायद्याचा आणि कुणाला फटका देणारा ठरतो याकडे नेहमीच लक्ष असते. प्रशांत किशोर यांनी भाजप, काँग्रेस, जेडीयू आणि तृणमूलसह अनेक पक्षांबरोबर काम केले आहे. त्यांच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. अलीकडेच त्यांनी बिहार राज्यातील मुजफ्फरपूर येथे टाइम्स नाऊ वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल? कुणाला फटका बसेल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राजस्थानात यंदा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. सध्यााच्या परिस्थितीत भाजप पुढे दिसत आहे. मागील काही महिन्यात काँग्रेसने चांगली कामगिरी करत वापसी केली आहे. मात्र तरीही भाजप पुढेच दिसत आहे. मध्य प्रदेशात मात्र भाजप-काँग्रेस यांच्यात घमासान होईल अशीच परिस्थिती आहे. पण मार्जिनचा विचार केला तर भाजपला थोडा फायदा देईल. छत्तीसगड राज्यातही दोन्ही पक्षात (Assembly Election) अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे. येथे सत्ताधारी काँग्रेस पार्टी भाजपाच्या पुढे दिसत आहे. तेलंगणा राज्यात यंदाही भारत राष्ट्र समिती सत्ता मिळवेल असा अंदाज किशोर यांनी व्यक्त केला.

Bharat vs India : ‘इंडिया’चं ‘भारत’ होणार का? युएनने सांगितले, प्रस्ताव आला तर नक्कीच…

पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ की ‘एनडीए’ आजच कळणार

सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज (शुक्रवार) मोजणी होणार आहे. या निवडणुकीत पाच जागा इंडिया आघाडीन एकत्र येत लढल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांआधी (Assembly Election) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांआधी एनडीए आणि इंडिया आघाडीतील लढत म्हणूनही या पोटनिवडणुकांकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेश, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तराखंड या ठिकाणी प्रत्येकी एक तर त्रिपुरातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube