निळवंडे प्रकल्प; दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम; 182 गावे ओलिताखाली येणार

निळवंडे  प्रकल्प; दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम; 182 गावे ओलिताखाली येणार

Nilwande Dam : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आणि डाव्या कालव्याचं उद्घाटन झालं. डाव्या कालव्यामुळे आता नगरसह, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहेत.

महाविकास आघाडीचे नेते श्रीवर्धनमध्ये एकत्र, सुनील तटकरेंविरोधात बांधणार मोट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज निळवंडे धरण परिसरात कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आलं. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेचे कळ दाबून पाणी सोडण्यात आले.

‘इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरी मोदींचे केसंही..,’; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

उर्ध्व प्रवरा प्रकल्प म्हणजेच डावा कालवा हा प्रकल्प राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक असून हा प्रकल्प प्रवरा नदीवर बांधण्यात आला आहे. या धरणाची एकूण लांबी ५३३ मीटर व ७४.५० मीटर इतकी उंची आहे.

Maratha Reservation : गाड्या फोडल्यानंतर सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

तसेच धरणाचा एकूण पाणीसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे. या प्रकल्पाच्या ८५ किमी लांबीच्या डाव्या व ९२.५० किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाईप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित करण्यात आली आहे.

विधान परिषदेला केलेला गेम लक्षात ठेवला अन् ठाकरेंनी शिंदेंच्या विरोधात भाजपचाच एक्का फोडला!

या प्रकल्पामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार 428 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार 231 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

Manoj Jarange यांनी पाणी तरी प्राशन करावं; संभाजीराजे पोहचले आंतरवाली सराटीत

तर श्रीरामपूर तालुक्यातील ३ गावांमधील ९९९ हेक्टर, राहुरी तालुक्यातील 21 गावांमध्ये ८ हजार ८९ हेक्टर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील २ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अशा एकूण १८२ दुष्काळी गावांतील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज