महाविकास आघाडीचे नेते श्रीवर्धनमध्ये एकत्र, सुनील तटकरेंविरोधात बांधणार मोट

  • Written By: Published:
महाविकास आघाडीचे नेते श्रीवर्धनमध्ये एकत्र, सुनील तटकरेंविरोधात बांधणार मोट

मुंबई: (विशेष प्रतिनिधी-प्रफुल्ल साळुंखे)-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एकत्र येत आहेत. श्रीवर्धनचे अजित पवार गटाचे खंदे समर्थक व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा बालेकिल्ला आहे. सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत. त्यांची मुलगी अदिती तटकरे या महिला बालविकासमंत्री आहेत. त्यात श्रीवर्धन मतदारसंघातून आमदार आहेत.
जिल्हा बँकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण,मुश्ताफ अंतुले हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत.

Ajit Pawar : सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणं देशाचा विकास; अजितदादांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक
उद्या (२७ ऑक्टोबर) रोजी श्रीवर्धन येथे रायगड जिल्हा सहकारी बँक शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शेकापचे नेते जयंत पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. बँकेचे शाखा उद्घाटन हा वरकरणी कार्यक्रम दिसत असला तरी तटकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीस सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतल्याचे समोर आले होते.

PM Modi Shirdi Visit : पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला PM मोदींकडून बूस्टर डोस; ‘शिर्डीत वाचला यशाचा पाढा

त्यानंतर शरद पवार यांनी बीड आणि गोंदिया येथे बैठक घेतल्या. आता सुनील तटकरे यांच्या विरोधात सर्व नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवार करताना दिसतायत.
एकीकडे रायगड जिल्हा परिषद, विधानसभेत मदत न करणे , डीपीडीसीच्या बैठकीत डावलने, निधी न देणे अशा अनेक प्रकरणात भाई जयंत पाटील आणि तटकरे कुटुंब यांच्यात संघर्ष सुरू आहे. तिकडे सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यात मंत्रिपदावरून जुंपली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांचा देखील तटकरे यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरू आहे. तटकरे जिल्ह्यात एकछत्री अंमल निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सर्वच नेत्यांकडून होतोय. अशा परिस्थितीत तटकरे यांच्या विरोधकांची मोट शरद पवार यांनी बांधली आहे. बँकेच्या कार्यक्रम असला तरी हा कार्यक्रम म्हणजे तटकरे विरोधात एकजूट असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

World Cup 2023 : इंग्लडने श्रीलंकेपुढे गुडघे टेकले; 156 धावांवर ऑलआऊट…


अनिल तटकरे राष्ट्रवादीमध्ये?

विधानपरिषदेचे माजी आमदार अनिल तटकरे यांचे देखील बंधू सुनील तटकरे यांच्यासोबत सख्य नाही. कौटुंबिक वादातून अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले. आता अनिल तटकरे याना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) पुन्हा संधी देणे आणि ताकद देणे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे, असे झाल्यास श्रीवर्धनमधून अनिल तटकरे हे पवार गटाचे उमेदवार असतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube