World Cup 2023 : इंग्लडने श्रीलंकेपुढे गुडघे टेकले; 156 धावांवर ऑलआऊट…
World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) सामन्यात इंग्लडविरुद्ध श्रीलंकेत सामना रंगत आहे. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं आहे. इंग्लडने अवघ्या 156 धावांवर खेळ आटोपला आहे. 33. 2 षटकांत 10 विकेट गमावून इंग्लडने 156 धावा केल्या आहे.
राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; ठाकरे, राऊतांना मोठा झटका; न्यायालयाने ‘तो’ अर्ज फेटाळला
इंग्लडच्या फलंदाजीमध्ये बेन स्टोक्सने महत्वाची भूमिका बजावली आहे. तर लंकेच्या लेहिरुने 35 धावांच्या मोबदल्यामध्ये 3 विकेट घेतले आहेत. तसेच मॅथ्यूजला गोलंदाजीमध्ये चांगलचं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. मॅथ्यूजने 2 विकेट घेतले आहेत. या सामन्यानंतर आता इंग्लड उपांत्या फेरीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे.
London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; ‘लंडन मिसळ’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
इंग्लडची फलंदाजीमध्ये बेन स्टोक्सची आठवी विकेट पडली होती. बेन स्टोक्स 43 धावा करून बाद झाला. इंग्लंडने 137 धावांवर आठवी विकेट गमावली आहे. इंग्लंडला विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. तर सहाव्या विकेटच्या रुपात मोईन अली 15 धावा करून बाद झाला. 24.4 षटकात 122 धावांवर इंग्लंडची सहावी विकेट पडली होती.
Gujrat News : मुलीचं बक्षीस जिंकणं वडिलांच्या जीवावर बेतलं; गरबा कार्यक्रमात असं काय घडलं?
इंग्लड संघाला ज्याच्याकडून अपेक्षा होत्या त्या जो रुटने अपेक्षांचा भंग केल्याचंच दिसून आलं आहे. जो रूटने अवघ्या तीन धावा करून धावबाद झाला आहे. रुटच्या रुपात इंग्लंडची दुसरी विकेट पडली. त्यानंतर बेन स्टोक्स क्रीझवर आला. 10 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या दोन विकेटच्या बदल्यात 59 धावांवर होती.
Salman Society: मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च पार्टी दणाणली धमाकेदार गाणं प्रदर्शित
सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लडची खराब बॅटींग झाल्याचं दिसून आलं. इंग्लडचा 3 षटकांनंतर 12 धावांवर स्कोर होता. डेव्हिड मलान 11 चेंडूत 5 धावा करून खेळत होता. तर जॉनी बेअरस्टो 7 चेंडूत 7 धावा केल्यानंतर खेळत होता. पहिल्या तीन षटकांत श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना कसून रंजिताने 6 धावा दिल्या. तर दिलशान मदुशंकाने 2 षटकात 8 धावा दिल्या होत्या.