Gujrat News : मुलीचं बक्षीस जिंकणं वडिलांच्या जीवावर बेतलं; गरबा कार्यक्रमात असं काय घडलं?

Gujrat News : मुलीचं बक्षीस जिंकणं वडिलांच्या जीवावर बेतलं; गरबा कार्यक्रमात असं काय घडलं?

Gujrat News : गुजरामधील पोरबंदरमध्ये आयोजित गरबाच्या कार्यक्रमात मुलीला मिळालेल्या दोन बक्षीसांपैकी एकच बक्षीस मिळाल्याने दाद मागण्यासाठी गेलेल्या मुलींच्या वडीलांच्या जीवावर बेतलं आहे. दुसरं बक्षीस का नाही दिलं अशी विचारणा करताच आरोपी आयोजकांनी वडिलांना बेदम मारहाण करीत हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

World Cup 2023 : ‘पाकिस्तान पुढील सामन्यात जिंकूच नये’; कॅप्टन आझमचा ‘काका’च भडकला

नेमकं काय घडलं?
सरमन ओडेदरा असं मृत व्यक्तीचं नाव असून नवरात्रोत्सवानिमित्त गुजरातमधील पोरबंदरमध्ये गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 11 वर्षीय मुलीने दोन्ही स्पर्धेत बक्षीसं जिंकली होती. मात्र तिला एकच ‘बेस्ट गरब्या’चा पुरस्कार देण्यात आला. तर दुसर बक्षीस दिलं नव्हतं. दोन्ही स्पर्धेत मुलगी बक्षीस जिंकली होती पण तिला एकच बक्षीस देण्यात आलं होतं.

‘शिवरायांची शपथ घेऊन सांगतो..,’; CM शिंदेंनी मराठा समाजाला ठणकावून सांगितलं

11 वर्षीय मुलीची आई मालीबेन ओडेदरा यांनी उद्योग नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले की, मुलगी सोमवारी रात्री गरब्याहून परतली तेव्हा तिने सांगितले की, ती दोन स्पर्धांमध्ये जिंकली होती पण तिला फक्त एक बक्षीस देण्यात आले होते. ही तक्रार घेऊन मालीबेन आयोजकांकडे गेल्या. मालीबेन आपल्या मुलीला घेऊन आयोजकांकडे गेल्या तेव्हा केशवलाने तिला क्रूरपणे सांगितले की, हा निर्णय मान्य करा नाहीतर निघून जा.

Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतला मोठा निर्णय…

त्यानंतर कुचडिया आणि बोखिरिया हे देखील घटनास्थळी आले आणि त्यांनी मालिबेन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेथून निघून न गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. एफआयआरनुसार खुचडिया आणि केशवाला यांच्या पत्नीने मालिबेन यांनाही शिवीगाळ केली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मालीबेन आपल्या मुलीसह आपल्या घरी गेल्या.

या घटनेनंतर तासाभरानंतर मालीबेन या पतीसह घराच्या बारमध्ये बसल्या असताना चार मुख्य आरोपी आणि त्यांचे तीन साथीदार दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी ओडेदरा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काठ्यांनी जबर मारहाण केली. मालीबेन यांचाही मृत्यू झाला. आरोपींनी ओडेदाराला दुचाकीवरून गरबा झालेल्या ठिकाणी नेले. तेथे पोलिस पोहोचेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी ओडेदाराला रुग्णालयात नेले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

दरम्यान, पीडित सरमन ओडेदारावर मंगळवारी रात्री 2 वाजता पोरबंदरमधील कृष्णा पार्क सोसायटीजवळ 7 जणांनी काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. घटनेतील सातही आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये राजा कुचडिया, राजू केशवाला, रामदे बोखिरिया, प्रतीक गोरानिया आणि त्यांच्या तीन साथीदारांचा समावेश असल्याची माहिती डीएसपी रुतू राबा यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube