Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतला मोठा निर्णय…

Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतला मोठा निर्णय…

Sushilkumar Shinde : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पुढील काळात आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय सुशीलकुमार शिंदे यांनी घेतला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे राजकारणात सक्रिय राहणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

लेट्सअप नवदुर्गा स्पेशल: ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवणाऱ्या विशाखा नाडकर्णी यांची मुलाखत I

सोलापुरात आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास वंदन केलं. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मराठा आरक्षण अभ्यासाला तेलंगणा निवडणुकीचा फटका; अधिकाऱ्यांमुळे कागदपत्र तपासणीत अडचण

याचदरम्यान, शिंदे यांना पत्रकारांकडून लोकसभा निवडणूकीबद्दल प्रश्न सवाल करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, मी आता किती वेळा सांगू, प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मी आता राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, सोलापुरात आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताफा शहरातील नवरात्र उत्सवाच्या मंडळांकडे रवाना झाल्याचं समोर आलं.

शिंदे सरकारकडे उरले अखेरचे काही तास; जरांगे पाटील यांच्यासमोर पाच पर्याय कोणते?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या विरोधात इंडिया पक्षाने देशभरात मोट बांधली आहे. येत्या काही महिन्यांत निवडणुका लागणार असल्याने राज्यातील मतदारसंघात सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.

आफ्रिकेकडून गतविजेत्या इंग्लंडची धुलाई; विजयासाठी 400 धावांचे टार्गेट

सोलापुर जिल्ह्यातही इंडिया आघाडीसह एनडीएकडून मतदारसंघात उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. अशातच आता सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणित शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

प्रणित शिंदे सध्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. आता आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणित शिंदेंना उमेदवारी जाहीर झाल्यास त्या खासदार म्हणून लोकसभेत जाणार का? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube