जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल

जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Maratha Reservation : सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आज तिसरी आत्महत्या झाली. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची दिलेली मुदत संपत आहे. या एक महिन्यात सरकारने काही निर्णय घ्यावेत, काही प्रक्रिया कराव्यात आणि आम्हाला आरक्षण द्यावे, अशी त्यांची अपेक्षा होती. या एक महिन्याच्या काळात तीन गरीब मराठा युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या डोळ्यांची पापणी देखील हलत नाही, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

ते पुढं म्हणाले की सरकार कशासाठी आहे, मंत्री काय करत आहेत, तुम्हाला बीजेपीने मराठ्यांचा चेहरा म्हणून बसवलं आहे ना? आपण काय करता? तीन आत्महत्या झाल्यात आणि मला भिती वाटते की हे लोण आणखी पसरत गेले तर लोक आणखी आत्महत्या करतील. अन् सरकार काय करत आहे जाहिरातीबाजीवर कोट्यावधी खर्च करत आहे. आज मी काही जाहिराती पाहिल्या, आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, यासाठी तुम्हाला बसवलं आहे, जाहीरातीसाठी नाही.

Sanjay Raut यांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश; ‘हे’ आहे कारण…

तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत. त्यामुळे या राज्यामध्ये दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकत. छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही, आम्हाला कोणी सर्टिफिकेट नको. दिल्लीत केंद्रातील नेत्यांची भाषा वेगळी आहे. या आंदोलनामध्ये जी फूट पाडण्याची सधन मराठ्यांनी रणनीती आखली आहे का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. दुर्बल मराठा समाजासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांचा आहे, आरोप संजय राऊत यांनी केला.

Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची परिस्थिती…

काही लोकांकडून चुकीचे विधाने केली जात आहेत. त्यामुळे मराठा तरुणांना नैराश्य येत आहे. जर चौथी आत्महत्या झाली तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवादाचा एफआयआर दाखल करावा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube