Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची परिस्थिती…

Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची परिस्थिती…

Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं…

मराठा आरक्षणासाठी आणखी एका विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवल्याचा आरोप मराठा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये नायगावजवळच्या गावात राहणारा हा विद्यार्थी आहे. ओंकार आनंदराव वावने असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर त्याने रविवारी सायंकाळी पीरजवळच्या विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं.

Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर भाग 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

यावेळी विहिरीत उडी घेण्यापूर्वी या विद्यार्थ्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यावरून हे स्पष्ट होत आहे की, या विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील मराठा आरक्षणासाठी हा दुसरा बळी गेला आहे. या चिठ्ठमध्ये त्याने लिहिले आहे की, माझे आई-वडील आम्हाला मोलमजूरी करून शिक्षण देत होते. पण आता मला त्यांची परिस्थिती पाहवत नव्हती. त्यामुळे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपण विहिरीमध्ये जीव देत आहोत असं या विद्यार्थ्यांने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे.

Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…

दरम्यान गेल्या काही दिवसांतील मराठा आरक्षणासाठी हा आणखी एक बळी गेला आहे. तर आरक्षण प्रश्नी नांदेडमध्ये एकाच दिवशी दोघांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठा तरूणांनी टोकाचं पाऊल उचलू नये. असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज