Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर भाग 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर भाग 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Dharmveer 2 : ‘धर्मवीर भाग 2’ (Dharmveer 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. तर ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांची ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवात धर्मवीर भाग 2′ (Dharmveer 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली.

धर्मवीर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

धर्मवीर 2 चित्रपटाचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या ठाणे मतदारसंघातील टेंभी नाक्यावर असलेल्या देवीचं दर्शन घेत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली. यावेळी चित्रपटात दिघे यांची भूमिका साकरणारा प्रसाद ओक हा दिघेंच्या वेशभूषेमध्ये या देवीच्या दर्शनाला आला होता. त्याचबरोबर चित्रपटाच्या टीमने माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान येथे देवीचे दर्शन घेतले. तसेच गरब्याच्या आनंद देखील लुटला.

Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे व निर्माते मंगेश देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” आगामी धर्मवीर भाग दोनमधून समोर येणार आहे. असं ते यावेळी म्हटले. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ‘धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग 2024 ला घेऊन येत आहोत’ अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली होती.

स्मिता पानसरे यांच्या मुलाचे अपघाती निधन

धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल !

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube