Govind Pansare यांचा नातू अन् स्मिता पानसरेंच्या मुलाचं अपघाती निधन

Govind Pansare यांचा नातू अन् स्मिता पानसरेंच्या मुलाचं अपघाती निधन

Govind Pansare : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांचा नातू आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांचा मुलगा अमित बन्सी सातपुते (वय 33, नेवासा फाटा, नेवासा) याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील भेंडा येथे एका अपघातामध्ये निधन झाले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची परिस्थिती…

स्कार्पिओ गाडीने धडक देऊन चालक गाडीसह पसार झाला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्कॉर्पिओ वाहन नागरिकांनी पकडलेले आहे.मयत अमित हा अॅड. कॉम्रेड बन्सी सातपुते व कॉम्रेड स्मिता पानसरे यांचा एकुलता एक मुलगा आहे. मयतास शव विच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमित याच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला आहे. अमित हा दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा नातू होता.

Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर भाग 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान अमित सातपुते हे एक पोल्टी व्यावसायिक होते. त्यांचे वडिल देखील सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव आहेत. तर अमित हा स्मिता आणि बन्सी सातपुते यांचा एकुलता एक मुलगा होता. तर त्यांचा हा अपघात भेंडा येथे व्यंकटेश ज्वेलर्स या दुकानासमोर अपघात झाला त्यात त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube