Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा (Pune Guardian Minister)पदभार स्विकारला. त्यानंतर पुणे शहरातील विविध विकासकामांवर अजितदादांची करडी नजर आहे. अजितदादांनी शहरातील विकासकामांचा पाहणी दौरा सुरु केला आहे. अजितदादा भल्या पहाटेच विकासकामांची पाहणी करायला पोहोचतात. त्यामुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांची अडचण होते. त्यावरुन पत्रकारांनी अजितदादांना तुम्ही पहाटे पाहणी दौरा का करता? अशी विचारणा केली. त्यावर अजितदादांनी भन्नाट उत्तर दिले.

Lok Sabha Election : शरद पवारांच्या मतदारसंघात नवा ट्विस्ट! राजकीय शिष्यालाच भाजप देणार तिकीट?

अजितदादा राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुणे शहरात एकापाठोपाठ बैठकांचा धडाकाच लावला. आज सकाळी अजित पवार पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील (Vadgaonsheri Assembly Constituency)विकासकामांचा पाहणी दौरा करण्यासाठी पहाटेच पोहोचले. सकाळी 6 वाजता येरवडा येथील नदी सुधार योजनेची अजितदादांनी पाहणी केली. त्यानंतर खराडीमधील ऑक्सिजन पार्क, खराडी येथाल जलशुद्धीकरण प्रकल्पाची देखील पाहणी केली. त्यावेळी अजिदादांनी माध्यमांशी संवाद साधला.

Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?

यावेळी अजितदादांना पत्रकारांनी पहाटे पाहणी दौरे करण्याचे कारण विचारले. त्यावर अजितदादांनी मिश्किलपणे याचं उत्तर दिलं. ते म्हणाले की, सकाळी पत्रकार शांत झोपलेले असतात. बाकीचे सगळे शांत झोपलेले असतात. या भेटीमुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये, उशीरा जर आलो तर सगळे नागरिक आपापल्या कामात असतात.

मुली-मुली शाळेत असतात. त्यात आम्ही यायचं म्हटल्यावर अधिकाऱ्यांच्या गाड्या,आमचा ताफा यामुळे इतरांना त्रास होऊ नये, एवढंच माझं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला जी पाहणी करायची असते ती करता यावी, आपल्या थोड्याफार अनुभवानुसार काही सूचना करता याव्यात, त्यामुळे आपण पहाटेच पाहणी करत असतो, असेही यावेळी अजितदादांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज