World Cup 2023 : ‘पाकिस्तान पुढील सामन्यात जिंकूच नये’; कॅप्टन आझमचा ‘काका’च भडकला

World Cup 2023 : ‘पाकिस्तान पुढील सामन्यात जिंकूच नये’; कॅप्टन आझमचा ‘काका’च भडकला

World Cup 2023 : विश्वचषकात सलग तीन सामन्यात (World Cup 2023) पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका होत आहे. क्रिकेट चाहते संघाच्या खेळाडूंवर चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) संघाचा कर्णधार बाबर आझमचा काका आणि माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) तर पाकिस्तान पुढील सामन्यातही पराभूत व्हावा, असे सांगितले. त्यामुळे कामरानच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. यासाठी पाकिस्तानला पुढील चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

एआरवाय न्यूजवर बोलताना अकमलने हे वक्तव्य केले. जर पाकिस्तानच्या क्रिकेटला आणखी बळकट करायचे असेल तर संघाने पुढला कोणताही सामना जिंकू नये. टॉप 4 संघातही पाकिस्तान नको. यावर न्यूज अँकरने विचारले की पाकिस्तान जिंकू नये असे तुम्हाला का वाटते. यावर अकमलने उत्तर दिले. पाकिस्तानचा संघ जिंकावा असच मला वाटतं. पण, पाकिस्तान क्रिकेटच्या सुधारणेसाठी संघाचा पराभव होणे गरजेचे आहे. त्यानंतर संघात बदल केले जावेत.

World Cup 2023 : आफ्रिकेचा पराक्रम! पराभव बांग्लादेशचा पण, झटका न्यूझीलँडला

जर सामने जिंकले तर संघाची अवस्था पुन्हा तशीच होईल. संघाचा पराभव झाला तर या खेळाडूंमधील अहंकार संपेल, असे कामरान अकमल म्हणाला. कामरान अकमलच नाही तर अन्य माजी खेळाडूंनीही बाबर आझमला कर्णधार पदावरून हटवावे असे म्हटले आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघात मोठे बदल करण्याची गरज आहे, असे मत माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होते.

पाकिस्तानला अजूनही संधी 

दरम्यान, पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम आहे. पाकिस्तानला अजूनही सेमी फायनल फेरीत प्रवेश करता येईल. मात्र यासाठी संघाला पुढील चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तरच संघाचा रनरेट चांगला होईल. पुढील सामने बलाढ्य संघांबरोबर होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानची वाट कठीण झाली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवाने संघाला मोठा धक्का बसला आहे. आता पुढील सामन्यांसाठी पाकिस्तानी संघाची काय रणनीती असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानची ‘झेप’; गतविजेता संघ तळाला

गतविजेत्या इंग्लंडचं काही खरं नाही 

मागील विश्वचषकात दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा संघ यंदा मात्र पूर्ण ढेपाळला आहे. स्पर्धेत इंग्लिश संघाने तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल कठीण झाली आहे. गुणतालिकेतही हा संघ तळाला गेला आहे. भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube