World Cup 2023 : आफ्रिकेचा पराक्रम! पराभव बांग्लादेशचा पण, झटका न्यूझीलँडला

World Cup 2023 : आफ्रिकेचा पराक्रम! पराभव बांग्लादेशचा पण, झटका न्यूझीलँडला

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांग्लादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटव डिकॉकने तुफान खेळी केली. या सामन्यात त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडले. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशला (Bangladesh) फक्त 233 धावाच करता आल्या. संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर पार काळ टिकू शकला नाही. या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने आफ्रिकेला (South Africa) मोठा फायदा झाला असून संघाने गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानची ‘झेप’; गतविजेता संघ तळाला

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली नव्हती. संघाच्या 36 धावा झालेल्या असताना रिझा हेन्ड्र्रिक आणि रस्सी वॅन देर डुसेने लवकरच बाद झाले. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि एडन मार्करम यांनी डाव सावरलाय. त्यानतंर हेन्रिक क्लासेन यांनी तुफान खेळी करत डाव सावरला. डिकॉकने 140 चेंडूत 174 तर मार्करमने 69 चेंडूत 60 धावा केल्या. तर क्लासेनने 90 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशची फलंदाजी ढेपाळली. संघातील कुणीही विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

न्यूझीलँडला असा बसला झटका 

या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळाल्यानंतर आफ्रिकेच्या संघाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तर न्यूझीलँडचा संघ आणखी खाली घसरला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी पाच सामन्यात सारखेच म्हणजेच 4-4 विजय मिळवले असून दोघांचेही गुणही समान आहेत. मात्र रनरेटच्या बाबतीत आफ्रिकेचा संघ पुढे निघून गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रनरेट +2.370 असा झाला आहे तर न्यूझीलंडचा रनरेट +1.481 असा आहे. त्यामुळे आफ्रिकेने न्यूझीलँडला मागे ढकलत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

आतापर्यंत 8 वेळा कोहलीचे शतक हुकलं, ‘या’ संघांनी सेंच्युरी होऊ दिली नाही

गतविजेत्या इंग्लंडचं काही खरं नाही 

मागील विश्वचषकात दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा संघ यंदा मात्र पूर्ण ढेपाळला आहे. स्पर्धेत इंग्लिश संघाने तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल कठीण झाली आहे. गुणतालिकेतही हा संघ तळाला गेला आहे. भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube