आतापर्यंत 8 वेळा कोहलीचे शतक हुकलं, ‘या’ संघांनी सेंच्युरी होऊ दिली नाही

आतापर्यंत 8 वेळा कोहलीचे शतक हुकलं, ‘या’ संघांनी सेंच्युरी होऊ दिली नाही

World Cup 2023 : धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाकडून विराट कोहलीने 95 धावा केल्या. विराटने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही. 104 चेंडूंचा सामना करताना कोहलीने 8 चौकार आणि 2 षटकार मारले आणि त्यानंतर तो 95 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. शतकाच्या जवळ जाऊन कोहली बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो सात वेळा अशाच पद्धतीने बाद झाला होता.

विराट कोहली 2010 मध्ये बांगलादेशविरुद्ध 91 धावांवर बाद झाला होता. यानंतर तो 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 94 धावांवर बाद झाला होता. कोहली 2013 मध्ये शतकाच्या जवळ आल्यानंतर दोनदा बाद झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 96 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 99 धावा केल्यानंतर तो बाद झाला. 2016 मध्ये त्याला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 91 धावांवर बाद केले होते. यानंतर 2017 मध्येही तो याच संघाविरुद्ध 92 धावा करून बाद झाला होता. इंग्लंडने 97 धावांवर कोहली बाद केला होता.

World Cup 2023 : विराटचा एक विक्रम हुकला पण कोहलीच्या त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोकं होती लाईव्ह

कोहली सचिन तेंडुलकरच्या वनडेतील शतकांच्या विक्रमाच्या जवळ आहे. त्याने आतापर्यंत 48 शतके केली आहेत. तर सचिनने 49 वनडे शतके झळकावली आहेत. कोहलीने आतापर्यंत 286 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 13,437 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 69 अर्धशतकेही केली आहेत. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता याच वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.

Israel Hamas War : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; इस्त्राईलच्या राष्ट्रध्वजाचे…

वर्ल्ड कपच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर सध्या टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. त्याचे 10 गुण आहेत. भारताने 5 सामने खेळले आहेत आणि त्यातील सर्व जिंकले आहेत. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 8 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेने 4 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. त्याचे 6 गुण आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube