World Cup 2023 : विराटचा एक विक्रम हुकला पण कोहलीच्या त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोकं होती लाईव्ह

World Cup 2023 : विराटचा एक विक्रम हुकला पण कोहलीच्या त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोकं होती लाईव्ह

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना झाला. न्यूझीलंडने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली. यावेळी विराट कोहलीने सामना ओढून आणला. मात्र त्याचा विक्रम हुकल्याची खंत क्रिडा चाहत्यांना देखील वाटली. तर विराटचा विक्रम जरी हुकला असला तरी त्याने आणखी एक विक्रम यावेळी केला.

त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोक होती लाईव्ह…

विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या महत्वाच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने विजय साकार केला. तर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकविले आहे. तर मागील सामन्यात विराट कोहलीने 48 वे शतक झळकविले आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली हा 95 धावांवर बाद झाला आहे.

Chaar Dham Yatra: वयाच्या 22व्या वर्षी अंजली अरोरा करणार ‘चार धाम यात्रे’ची सफर

त्यामुळे सचिनच्या एकदिवसीय शतकांच्या विक्रमाला गवसणी तो घालू शकला नाही. मात्र कोहलीच्या या अविस्मरणीय खेळीचा क्षण हॉटस्टारवर तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला. त्यामुळे जरी त्याचा विक्रम हुकला असला तरी चाहत्यांच्या मनात त्याने स्थान पुन्हा अबाधित ठेवत लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये रेकॉर्ड केलं आहे.

Happy Birthday Prabhas: अभिनेता प्रभासला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर …

दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग पाचवा विजय आहे. तर आतापर्यंत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडच्या खात्यात पहिल्या पराभवाची नोंद झाली. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 273 धावा केल्या. संघाच्या डावात डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 130 धावांची खेळी करत संघाला मोठा आधार दिला.

एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला धावगती त्याने कायम राखली. 130 धावांवर असताना शमीच्या एका चेंडूवर विराटच्या हाती झेल देत मिचेल बाद झाला. सलामीचे फलंदाज अपयशी रहिले. डेवॉन कॉनव्हे तर शून्यावरच बाद झाला. त्याला सिराजने श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केला. यानंतर विल यंगही (17) फार काही करू शकला नाही. शमीच्या गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube