लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र; भाजपची काँग्रेसवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे पैसे जमा करत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडं महाराष्ट्र काँग्रेसने मोठी मागणी केली आहे. (Election) महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबात आयोगाला तसं पत्रही पाठवण्यात आलं आहे. याच मुद्यावरुन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा लाडकी बहिणी द्वेषाचा क्रूर चेहरा उघड झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता- भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे.
आता तर, काँग्रेसने हद्द पार केली आहे. बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. बहिणींच्या संसाराला आधार मिळतो. हातभार लागतो. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तर,पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष, मत्सर, आकस उफाळून आला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहे. ही रक्कम लाडक्या बहिणींना देऊ नका, म्हणून काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे बावनकुळे म्हणाले. आम्ही काँग्रेसच्या विकृत कृतीचा निषेध करीत आहोत. काँग्रेसला या राज्यातील आमच्या माता भगिनी कधीही माफ करणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचा खरा चेहरा आता पुढे आला असल्याचे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन ममहिन्यांचे 3000 रुपये एकत्रीत देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावीत करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामुहीक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे.
लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच असे निर्देश आयोगाने शासनास द्वावेत असी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडं केली आहे. तसंच, लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस ‘लाच’ म्हणते..? अशी टीका भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. निवडणूक लागली म्हणून हक्काचा पैसा रोखण्याचा त्यांचा हा घाणेरडा डाव आहे. ज्यांनी आयुष्यभर बहिणींना उपेक्षित ठेवलं अशा सावत्र भावांना लाडक्या बहिणी 15 तारखेला सडेतोड उत्तर देतील अशी टीका वाघ यांनी केली आहे.
