Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार 4500 रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आतापर्यंत खात्यात जमा न झाल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये

  • Written By: Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आतापर्यंत खात्यात जमा न झाल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तसेच राज्य सरकारवर विरोधक देखील जोरदार हल्लाबोल करत आहे. तर आता लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रित लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मकरसंक्रातीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार असं सांगितलं जात आहे. मात्र सरकारकडून आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना दिला जाणार अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे 2026 पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500  रुपये जमा होणार आहे.

महिलांना मिळणार 4500 रुपये

मकरसंक्रातीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा केल्या जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवाारी महिन्याचा हप्ता राज्य सरकारकडून एकत्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण मारणार बाजी? आज 288 नगरपरिषद- नगरपंचायतीचा निकाल; 10 वाजता मतमोजणीला सुरुवात

ई केवायसीला मुदतवाढ?

तर दुसरीकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ईकेवायसी अनिवार्य केले आहेत. यासाठी राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यत मुदत दिली आहे. मात्र आता या योजनेत केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.

follow us