लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सर्वकाही

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार पुढील काही

  • Written By: Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार पुढील काही दिवसात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे. नुकतंच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर आता ऑक्टोबर महिन्याचे पैसै देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

410 कोटी मंजूर

लाडकी बहीण योजनेंच्या लाभार्थी महिलांच्या बँक (Ladki Bahin Yojana) खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने आता लवकरच ऑक्टोबर महिन्याचे पैसै देखील जमा केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार?

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँख खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिनाअखेरपर्यंत जमा होऊ शकतात. दिवाळी असल्याने राज्य सरकार महिनाअखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसै जमा करु शकतात. याबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

तर दुसरीकडे राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे काही नियम बदलल्याने आता या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर पात्र महिलांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी केली आहे.

follow us