लाडकी बहीण योजना : सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये

लाडकी बहीण योजना : सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये

Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 8 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या योजनेअंतर्गत अनेक पुरुषांनी बोगस बँक खाते वापरुन या योजनेचा फायदा घेत सरकारची (Mahayuti Government) फसवणूक केली असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकारकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसांत कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेला 26 लाख लोकांचा डेटा व्हेरिफाय करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे 26 लाख लोकांच्या खात्यांच्या माहितीमध्ये काही महिलांचे खाते नसल्यामुळे कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची माहिती देखील सरकारला मिळाली आहे. त्यामुळे अशा महिलांचा लाडक्या बहिणीचा लाभ सुरु राहणार आहे मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महिला व बालकल्याण बोगस खातेधारकांकडून 11 महिन्यांचे 16 हजार 500 रुपये वसूल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात बोगस खाते वापरुन सरकारची फसवणूक करणाऱ्या लोकांवर राज्य सरकारकडून काय कारवाई करण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर भविष्यात लाडकी बहीण योजना सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नसल्याने ही योजना बंद करण्यात येणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती महायुती सरकारकडून देण्यात येत आहे.

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube