लाडकी बहीण योजना, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

लाडकी बहीण योजना, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुती सरकारवर (Mahayuti Government) विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. दुसऱ्या राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पात्र महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा महायुतीकडून आश्वसन देण्यात आले होते मात्र आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना 2100 रुपये दिले नसल्याने सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहे.

तर दुसरीकडे या योजनेअंर्तगत पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी जमा होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता पात्र महिलांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे आज माध्यमांशी बोलत होत्या.

माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, एप्रिल महिना संपवण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. मात्र माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी कोणतीही तारीख दिली नसल्याने अक्षय तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिल रोजी पात्र महिलांना पैसे मिळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे यावेळी आदिती तटकरे यांनी पात्र महिलांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेबद्दल सुरुवातीपासून फार गैरसमज पसरवले गेले आहेत. अडीच लाखांचे उत्पन्न असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यात नवं काही नाही. लाडकी बहीण योजनेचा शासननिर्णयात हेच नमूद आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे यांनी दिली.

कुंभमेळा 2027 साठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; आता नाशिकलाही बाह्यवळण

पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, संजय गाधी निराधार योजनेतून घेत असतील तर त्यांना त्या योजनेचे 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे तसंही त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना 1000 रुपये मिळत आहे आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. हेच मूळ शासननिर्णयातही म्हटलं आहे. असं देखील आदिती तटकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube