‘या’ दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात विधानसभा 2024 निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti Government) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेचा फायदा घेत महायुती सरकारने दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे मात्र आतापर्यंत लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळत नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात 2100 रुपयांबाबत घोषणा होणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र या अर्थसंकल्पात देखील याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने आता विरोधकांनी या प्रकरणात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे विधानसभेत या योजनेबद्दल बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेत बोलताना लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार? अधिवेशनात घोषणा होणार का? आम्हाला पॉइंटेड उत्तर हवं आहे, असं रोहित पवार म्हणाले.
खोक्याच्या अडचणी वाढणार, शिरूर पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
यावर उत्तर देत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक महत्वकांक्षी योजना आहे, ती महायुतीच्या सरकारनं आणली आहे. माहिलांना 1500 रुपयांचा लाभ वितरीत करणारं हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो आंनद आहे, तो कायम राहणार आहे. 2100 रुपयांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार योग्यवेळी निर्णय घेतील. अशी माहिती विधानसभेत आदिती तटकरे यांनी दिली.