BMC Election : …म्हणूनच पंतप्रधान मोदींची मुंबईतील सभा रद्द ; मनसे नेत्याचा दावा
BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पं
BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) येणार होते मात्र त्यांची सभा रद्द झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द झाली असल्याचा दावा करत मनसे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भाजपसह (BJP) शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) पक्षाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही समजलं आहे, त्यामुळे मुंबईतील त्यांची सभा रद्द झाली आहे असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले. तसेच मुंबईत काही बदल होणार नाही हे त्यांना कळलं आहे. मुंबई (BMC Election) ही मराठी माणसांकडे आणि ठाकरेंकडेच राहणार आहे असा दावा देखील मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी CBI चौकशी; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती झाली असून भाजप आणि शिवसेना शिंदे गट देखील एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची देखील निवडणुकीच्या रिंगणात आघाडीकडून उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही; संग्राम जगताप विरोधकांवर भडकले
