सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी CBI चौकशी; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत बोलताना सिस्पेच्या हजारो
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत बोलताना सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशी लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकरणात गरिबांचा पैसा खाणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येणार असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांसाठी आयोजित प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे की, यापूर्वीची निवडणूक अहमदनगर महापालिकेची झाली होती मात्र आता अहिल्यानगर महापालिकेची होत आहे असून अहिल्यानगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार आहे. मुघलांनी उध्वस्त केलेली घाट, मंदिरे हे घडवीण्याचे काम करणाऱ्या अहिल्यादेवीचे नाव या जिल्ह्याला देण्यात आले आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी येथे तुमच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी येथे आलो आहे मात्र तुम्ही येथे आधीच पाच नगरसेवक बिनविरोध करुन दिले आहे. महापालिकेत पूर्ण बहुमत मिळेल आणि महापौर महायुतीचा होणार असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच अहिल्यानगर पालिकेला 492 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देऊ असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 30 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिली असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर अहिल्यानगरमध्ये डिफेन्स कॉरिडॉर तयार करणार असल्याची देखील मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत बोलताना केली.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकांनी कंपन्या स्थापन करून गरिबांना लुबाडण्याचं काम केलंय. सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशी लावली जाईल. गरिबांचा पैसा खाणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नाव बदलू देणार नाही : आमदार संग्राम जगताप
या सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले की, जिल्ह्याचे नामांतर झाल्यापासून ही पहिली महापालिका निवडणूक होत असून युती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे मात्र दुसऱ्या बाजूला काही लोक सांगत आहे की, जर आमच्या विचाराचे लोक निवडून दिले तर आम्ही पुन्हा एकदा जिल्ह्याचा नाव बदलणार त्यामुळे आता 15 जानेवारी रोजी आपल्या मतदानाच्या माध्यमांतून दाखवायचा आहे की आपल्याला काय मान्य आहे असं या सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले. तसेच जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही अशी ग्वाही देखील आमदार जगताप यांनी दिली.
आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही; संग्राम जगताप विरोधकांवर भडकले
