मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का! ठाकरेंचा शिलेदार संतोष धुरींचा लवकरच भाजप प्रवेश
MNS Santosh Dhuri यांना मनसेकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. धुरी यांनी नाराज होत थेट भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.
MNS suffers setback ahead of BMC elections Raj Thackeray’s ally Santosh Dhuri to join BJP soon : सध्या राज्यासह मुंबईमध्ये महानगर पालिकांचा धुराळा उडालेला आहे. त्यामध्ये अनेक पक्षांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराजांची फौज निर्माण झाली आहे. त्यामध्ये अशाच एका नाराजामुळे ऐन मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरेंचा शिलेदार संतोष धुरींचा लवकरच भाजप प्रवेश
ठाकरेंची साथ सोडणाऱ्या नेत्याचं नाव आहे संतोष धुरी. त्यांना मनसेकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांना वरळीमधील वार्ड क्रमांक 194 मधून उमेदवारी हवी होती. मात्र या ठिकाणी ठाकरेंच्या पक्षाचे निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर धुरी यांनी नाराज होत थेट भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.
बांगलादेशमध्ये IPL वर बंदी; BCCI ला होणार नुकसान? जाणून घ्या सर्वकाही
या भाजप प्रवेशाची चर्चांना उधाण आले आहे. ते धुरी यांनी मनसेची साथ सोडताच त्यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी माझी कदर केली. परवा मला नितेश राणे यांनी संपर्क केला. ते सिंधुदुर्गवरून माझ्यासाठी खास आले होते. त्यांनी भेट घेऊया असे म्हणाले त्यानुसार काल भेटले. अर्धा तास गप्पा झाल्या बर वाटलं भेटून. तिकीट वैगरे हा विषय नाही.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे भविष्य ठरणार; निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय?
पॉलिटिकल जे काही आहे. ते दुपारी बोलेन. तुम्ही दखल घेतली. त्यासाठी मनापासून आभारी आहे. नितेश राणे हे कोकणातले त्यामुळे बर वाटल नेहमी ते मदत देखील करायचे. माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. देशपांडे यांच्याबरोबर मैत्री नक्कीच कायम राहील त्यांनी ठेवली. तर आम्ही सगळ्याच पक्षावर आम्ही तिला करतो विरोधाला आल्यावर तिला होतेच. मनसेत प्रवेश केला तेव्हा पण अती शर्ती नव्हत्या ठेवल्या. त्यांनी जे दिले ते घेतले आताही ठेवल्या नाही.
