बांगलादेश भारतात वर्ल्डकप मॅच खेळणार नाही!; मुस्तफिजूरला आयपीएलमधून बाहेर केल्यानंतर BCB चा मोठा निर्णय

भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकातील कोणतेही सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर जाणार नसल्याची बीसीबीची अधिकृत माहिती.

  • Written By: Published:
Untitled Design (209)

Bangladesh will not play World Cup matches in India! : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) T20 विश्वचषक 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश(Bangladesh) क्रिकेट संघ भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकातील कोणतेही सामने खेळण्यासाठी भारत(India) दौऱ्यावर जाणार नसल्याची अधिकृत माहिती बीसीबीने दिली आहे. बीसीबीने हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेतल्याचे स्पष्ट केले असून, याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाठवलेल्या ई-मेलमध्येही सुरक्षा हीच प्रमुख बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बीसीबीच्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, ‘सुरक्षेच्या कारणांमुळे T20 विश्वचषकासाठी बांगलादेश संघ भारतात पाठवणे शक्य नाही.’

बीसीबी संचालकांची महत्त्वाची बैठक

रविवारी दुपारी बीसीबीच्या 17 संचालकांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत बांगलादेशचा विश्वचषकातील एकही सामना भारतीय भूमीवर न खेळण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेण्यामागे इंडियन प्रीमियर लीग 2026 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातून वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला वगळण्यात आल्याची घटना निर्णायक ठरल्याचे सांगितले जात आहे. केकेआरने मुस्तफिझूरला गेल्या वर्षीच्या मिनी लिलावात 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात; उद्धव आणि राज ठाकरेंनी संयुक्तरित्या जाहीर केला वचननामा

मुस्तफिझूर प्रकरणानंतर तणाव वाढला

मुस्तफिझूर रहमानला केकेआरमधून वगळल्यानंतर बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाने बीसीबीला सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलवण्याची औपचारिक मागणी करण्याचे निर्देश दिले होते. बीसीबीने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेश सरकारचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे की, ‘जर करार असूनही बांगलादेशी खेळाडू भारतात आयपीएल खेळू शकत नसेल, तर संपूर्ण संघासाठी भारत दौरा सुरक्षित ठरणार नाही.’

मुस्तफिझूरची IPL एनओसी रद्द

या पार्श्वभूमीवर बीसीबीने मुस्तफिझूर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दिलेली एनओसी तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, केकेआरने निर्णय बदलला तरी सुरक्षेच्या कारणास्तव मुस्तफिझूर आयपीएल 2026 मध्ये खेळू शकणार नाही.

ICC च्या निर्णयाची प्रतीक्षा

बीसीबीने केलेल्या विनंतीवर आयसीसीकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. दरम्यान, बीसीसीआयने सामने इतर देशात हलवण्याचा प्रस्ताव ‘लॉजिस्टिकली अशक्य’ असल्याचे सांगत नाकारला आहे.

लव्ह जिहाद कसा संपवणार?, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली त्रिसूत्री

राजकीय प्रतिक्रिया

आसिफ नजरुल यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करत बांगलादेशच्या भारत दौऱ्याला असलेला विरोध पुन्हा स्पष्ट केला. त्यांनी लिहिले, ‘बांगलादेश T20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. बीसीबीने आज हा निर्णय घेतला आहे.’

बांगलादेशचा संघ जाहीर

दरम्यान, बांगलादेशने T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. लिटन दास याची कर्णधारपदी तर सैफ हसनची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बांगलादेशचे नियोजित सामने (आता अनिश्चित)
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज – 7 फेब्रुवारी, कोलकाता
बांगलादेश विरुद्ध इटली – 9 फेब्रुवारी, कोलकाता
बांगलादेश विरुद्ध इंग्लंड – 14 फेब्रुवारी, कोलकाता
बांगलादेश विरुद्ध नेपाळ – 17 फेब्रुवारी, मुंबई

मला माझे पप्पा आणून द्या; हत्या झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीचा अमित ठाकरेंपुढं टाहो

भारत-बांगलादेश क्रिकेट संबंध तणावात

याआधी वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारतीय संघाचा बांगलादेश दौरा पुढे ढकलला होता. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारची मंजुरी घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध गंभीर संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.

follow us