अहमदाबादमध्ये आज चौकार अन् षटकारांचा पाऊस; खेळपट्टी कोणाला करणार मदत ?

IND vs SA  :   टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये आज भारतीय संघ आपला पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

  • Written By: Published:
IND Vs SA 

IND vs SA  :   टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये आज भारतीय संघ आपला पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार असून भारतीय संघाच्या कामगिरीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी वापरली जाणारी खेळपट्टी फलंदाजांना की गोलंदाजांना मदत करणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गोलंदाज की फलंदाज आज फायदा कुणाला?

टी20 विश्वचषक 2026 मध्ये अहमदाबादमधील (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (IND vs SA) आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये, खेळपट्टीने फलंदाजांना अनुकूलता दर्शविली आहे. मात्र अहमदाबाद हे खूप मोठे मैदान असल्याने फिरकीपटूंना मधल्या षटकांमध्ये मदत मिळते परंतु एकदा फलंदाज सेट झाला की, त्याला फलंदाजी खूप सोपी जाते. भारत आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या सामन्यात दव पडला होता त्यामुळे दोन्ही संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. भारतीय संघाने या स्पर्धेत अहमदाबादमध्ये एक सामना खेळला आहे, तो जिंकला आहे. दरम्यान, आफ्रिकन संघाने या खेळपट्टीवर दोन सामने खेळले आहेत, दोन्ही सामने जिंकले आहेत.

भारतीय संघ

इशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मोठा हल्ला , 7 टीटीपी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त; 19 जण ठार-

दक्षिण आफ्रिका संघ

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडेन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रुईस, डेव्हिड मिलर, जेसन स्मिथ, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, अँरिच नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, जॉर्ज लिंडे, ट्रिस्टन स्टब्स, क्वेना म्फाका.

follow us