Sanjay Raut : ‘काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला
Sanjay Raut : विजयादशमीनिमित्त काल उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे स्वतंत्र दसरा मेळावे (Dasara Melawa) झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत शिवसेनेत राहणार होतो म्हणता ते शिवसेनेत का राहिले नाहीत असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाजप आणि शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले.
Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं चौंडीत भावनिक आवाहन
राऊत पुढे म्हणाले, शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपला मजबूत करा असे म्हणत होते. यांनी भाजपाच्या समोर एवढे गुडघे टेकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच देशाचं, जनतेचं, महाराष्ट्राचं म्हणणं मांडलं. पण, हे मेळाव्यात म्हणतात भाजपला मजबूत करा. मोदींना मजबूत करा, नड्डांना मजबूत करा, फडणवीसांना मजबूत करा. शिवसेनेची सभा होती ना तुमची? भाजपाने भाड्याने पाठवलेल्या लोकांसमोर तर त्यांना मोदींचा विजय असो, अमित शहांचा विजज असो हेच म्हणावं लागेल, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
काही दिवसांनी काळ्या टोप्या घालून फिरतील
यांना स्वतःचा आचार-विचार काहीच नाही. जे भाजप सांगेल तेच. काही दिवसांनी हे डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील. शिंदे गटालाच भाजपात जावं लागेल. भाजप आमचा छळ करतंय सांगत जाहीर सभेत राजीनामा देणारे हे. आता भाजपनेच त्यांना मांडीवर घेतलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
आता तुमची दातखीळ का बसली ?
महाराष्ट्रात हत्याकांड झाले नाही का? यांचं सरकार आल्यानंतर असा सवाल राऊत यांनी केला. पालघरचे हत्याकांड म्हणजे एक प्रकारचं विचार करून केलेलं कारस्थानच होतं. उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं घडलेलं अपघाताचे प्रकरण वाढवण्यात आलं. त्यानंतर अनेक साधूंवरती हल्ले झाले, हत्याकांड झाले, त्यावर तुमची का दातखीळ बसली आहे, असा सवाल यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना केला.
प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने गाल चोळत…; ठाकरेंनी नार्वेकरांना फटकारले !
जनतेच्या न्यायालयात चला, तिथेच फैसला होईल
तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा अशी सभा घेऊनच दाखवा. आम्हाला न्यायालयाच निर्णय नकोय. आता जनतेच्या न्यायालयात चला. तिथे कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी तिथेच ठरेल, असे आव्हान राऊत यांनी दिले. फक्त महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम यांच्याकडून केले जात असल्याचेही राऊत म्हणाले.