Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं चौंडीत भावनिक आवाहन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम आज संपला. उद्यापासून पुन्हा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथे दिला. यावेळी त्यांनी आपल्याला गद्दारी करण्याचा चान्स होता मात्र मी जातीशी प्रामाणिक आहे. असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे.
मला गद्दारी करण्याचा चान्स होता
चौंडी मनोज जरांगे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बोलताना ते म्हणाले की, ठेवून तिला तर आरक्षण मिळणार नाही. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. माझ्याजवळ अख्ख मंत्रिमंडळ येऊन बसलं होतं. मला गद्दारी करण्याचा चान्स होता. मात्र मी माझ्या जातीशी प्रामाणिक होतो मला माझ्या समाजासाठी लढा द्यायचा होता. असं देखील यावेळी जरांगे म्हणाले.
दसरा फॅशन अन् अंकिता लोखंडेचे मंत्रमुग्ध करणारे एथनिक लूक्स
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, आरक्षणा शासनाने मागितलेल्या 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला. आज मनोज जरांगे यांनी प्रशासनाल कडकशब्दात इशारा दिला आहे. ते सारखं म्हणतायेत अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे मात्र एवढं करू नये त्यांना अजूनही पर्याय सुचना. उद्यापासून आम्ही शांततेचे युद्ध पुकारला आहे.
आरक्षणासाठी लढा राजकारण आणू नका
निवडणुकीच्या आदी आरक्षण अनु या तयारी मध्ये राहू नका 50 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानुसार तयारीला लागा. आज विजयादशमीची शपथ घ्या घरोघरी जा. लढा द्या मात्र लढा देताना जात म्हणून लढा राजकारण म्हणून नको. कांदा, बटाटे चिन्ह वगैरे हे काय राजकारण घेऊन येऊ नका तुम्ही एकत्र आलात तरच आरक्षण मिळेल.
50 दिवसांची वाट बघू नका
आरक्षणासाठी तुम्ही 50 दिवसांची मुदत दिली आहे मात्र 50 दिवसांची वाट बघू नका कारण काही दिवसांची मुदत दिली होती. मात्र मी पाहतायत म्हणूनच तुमचे 50 देखील असेच होतील की, काय म्हणून शांत बसू नका. उद्यापासून सुरुवात करा. आरक्षण मिळणार नसेल तर तुम्ही देखील आमच्या दारात यायचं नाही अशा स्पष्ट शब्दात मनोज जारंगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.